नवेगावबांध दि.२८ ऑगस्ट:-
सावरटोला ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तान्हा पोळा सावरटोला ग्रामपंचायत च्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तान्हा पोळ्यात 300 बालगोपालांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला होता. ग्रामपंचायत परिसरात अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे,उपसरपंच सुवर्णा तरोणे, बोरटोला ग्रामपंचायतचे सरपंच कुरुंदा वैद्य, सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश लाडे, पोलीस पाटील शंकर तरोणे, सामाजिक कार्यकर्ते मराठा सेवा संघाचे सुनील तरोणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सरिता मेश्राम,उपाध्यक्ष सेवकराम मेश्राम, संजीव बडोले,मनोहर तरोणे, गुरुदेव संघाचे राधेश्याम तरोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गावातील मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावी मध्ये विज्ञान विषयात सर्वप्रथम आलेल्या आदित्य राऊत, कला शाखेतून प्रथम आलेल्या वैष्णवी वलथरे, इयत्ता दहावी मध्ये गावातून सर्वप्रथम आलेल्या प्रांजली शिवणकर व वैभव तरोणे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तान्हा पोळ्यात गावातील तीनशे बालगोपाल स्वयंस्फूर्तीने सजावट केलेले नंदीबैल घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.सर्व सहभागी बालगोपालांना खाऊ वाटप करण्यात आले. राजेंद्र तरोने यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाचे संचालन भागवत मुनेश्वर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अश्विनी तरोणे यांनी मानले.
सामूहिक आरती नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. स्नेहल तरोणे, ग्रामपंचायत सदस्य डॅनी डोये, उर्मिला शिवणकर,दिलीप मेश्राम, कविता चचाने,धर्मेंद्र गजबे, सीमाताई शेंडे,प्रकाश शिवणकर,गोवर्धन मुनेश्वर, दुधराम तरोणे, राकेश डोये, पुरुषोत्तम मेश्राम,केशव बांबोळे, महादेव डोये, देवराम शिवणकर,यादवराव तरोणे यांच्यासह कार्यक्रमाला सावरटोला येथील ग्रामस्थ महिला,पुरुष व बालगोपाल बहुसंख्येने उपस्थित होते.