भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendramodi) यांचा फोटो लाऊन निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळविणाऱ्या बेईमान आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे (uddhavthackeray)यांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो की, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर पुन्हा अशी व्यक्तिगत टीका केली तर भाजपा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिला.
उद्धव ठाकरे |
त्यांनी सांगितले की, मा. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना सन्मानाने वागवले. ते विसरून स्वतः बेईमान असलेले उद्धव ठाकरे मा. देवेंद्रजींबद्दल अशी टिप्पणी करतात. आज मा. देवेंद्रजींबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादा ओलांडली आणि उपकारांची अशी परतफेड केली. मा. देवेंद्रजी आजही संस्कारांची मर्यादा पाळतात. त्यांनी आपले संस्कार दूर ठेऊन रौद्र रूप दाखविले तर उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात राहणे मुश्कील होईल एवढी सामग्री मा. देवेंद्रजींकडे आहे.
#devendrafadnavis #bjp #narendramodi #maharashtra #bjpmaharashtra #sharadpawar #amitshah #india #uddhavthackeray #ajitpawar #shivsena #news #marathi #modi #congress #tv #mumbai #rohitpawar #bjpindia #pune #rajthackeray #rahulgandhi #ncp #amolkolhe #dhananjaymunde #rohitdadapawar #ajitdadapawar #jpnadda #sanjayraut #indianpolitics