राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्षपदी कपिल वानखेडे यांची नियुक्ती
*खापरखेडा-प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावनेर तालुक्यात अधिकाधिक मजबूत व्हावी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे हात मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून नुकताच सावनेर तालुक्यातील कार्यकारणी मध्ये फेरबदल करण्यात आला.
माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी कपिल वानखेडे यांची नियुक्ती सावनेर तालुका अध्यक्ष म्हणून केली कपिल वानखेडे यांनी यापूर्वी सावनेर तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यरत असतांना त्यांच्या कार्यशैलीमूळे वरिष्ठ नेते प्रभावित झाले वानखेडे यांच्या नियुक्तीने सावनेर तालुक्यात पक्ष नव्याने उभारी घेऊन बळकट होईल अशी आशा जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी व्यक्त केलेली आहे. यावेळी कपिल वानखेडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस सावनेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सावनेर विधानसभा अध्यक्ष किशोर चौधरी व जिल्हा उपाध्यक्ष अमर जैन यांचे आभार मानले.
कपिल वानखेडे यांचे माजी अध्यक्ष नाना केने, सुधाकर तिबोले, साबीर मिर्जा, विनोद गोडबोले, रामु बसुले, सुरेंद्र वानखेडे, आश्विन महाजन, रोशन वानखेडे, पंकज मधुमटके, अभय मिश्रा, स्वप्नील कावळे, विक्की थापा, विनोद कोथरे, आदित्य पाटील, आदी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.