Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १८, २०२२

Chandrapur Tiger News | दोघांचा जीव घेणाऱ्या वाघाला पकडले


The Man Eating Tiger That Killed The Two Was Captured Chandrapur District Crime News

The Man Eating Tiger That Killed The Two Was Captured Chandrapur District Crime News

ब्रम्हपुरी | Brahmapuri  तालुक्यात १६ ऑगस्टला  दुधवाही येथील शेतशेत शिवारात  मुखरू  राऊत याला वाघाने ठार केले तर पद्मापूर येथे गुराखी प्रभाकर मडावी याला वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आणि दुसऱ्या दिवशीही १७ ऑगस्टला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अड्याळ शेत शिवारात वाघाने विलास विठोबा रंधये या शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. या वाघाला वनविभागाने आज जेरबंद केले. Chandrapur News ब्रह्मपुरी (Brahmapuri Maharashtra) वरून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‍‍‍‍‍‍ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या अड्याळ जंगलव्याप्त मेंढा शेतशिवारात वनविभागाने आज जेरबंद केले. 

Chandrapur Tiger Attack |


Tiger Attack | दुसऱ्या दिवशीही वाघाच्या हल्यात शेतकरी ठार

https://www.khabarbat.in/2022/08/tiger-killed-farmer-and-injured-grazier.html




*वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर नरभक्षक वाघ जेरबंद.*

*खा. नेते व माजी आमदार प्रा. देशकर यांनी वाघाला पकडण्याची केली होती मागणी.*

ब्रह्मपुरी : मागील काही दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यातील हत्तीलेंडा, सायघाटा, दुधवाही, अड्याळ या परिसरात वाघांचा वावर वाढला होता. शेतशिवारांमध्ये, रस्त्यावर हे वाघ नागरिकांना दिसत होते. या वाघांनी मागील काही दिवसात काही नागरिकांना ठार केले व काहींना जखमी केले. दोन दिवस आधी हत्तीलेंडा परिसरात वाघाने एका इसमाची शिकार केली व एकाला जखमी केले. यानंतर तात्काळ क्षेत्राचे खासदार अशोक नेते व ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी येथील वनविभागाच्या कार्यालयात उपवनसंरक्षक यांची भेट घेतली होती. यावेळी वाघाला जेरबंद करण्याची मागणी दोघांच्या वतीने करण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक श्री. मल्होत्रा यांच्याकडून सकारात्मक कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते.


काल ही अड्याळ येथे वाघाने एका युवकाला ठार केले. वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच माजी आमदार प्रा. देशकर यांनी राज्याचे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत फोनवर चर्चा करून सदर वाघाला जेरबंद करण्याची विनंती केली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वनविभागाला ताबडतोब वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश दिले व आज सकाळी वाघाला जेरबंद करण्यात आले. यासोबतच दुसऱ्या वाघालाही लवकरच जेरबंद करू असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

The Man Eating Tiger That Killed The Two Was Captured Chandrapur District Crime News

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जर बंद करण्याचे दिलेले निर्देश नागरिकांना भयमुक्त करणारा आहे. Today tiger news 

Latest news on tigers in India

Tiger News Today

Tiger news today 

Tiger news Recent tiger attack 2022

Today News tiger attack

Tiger news in Brahmapuri Maharashtra



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.