Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून १०, २०२१

गैरप्रकार केल्याचा व्हिडीओ वायरल; आसरा रुग्णालयातील ८ वॉर्डबॉय कामावरून कमी



आसरा रुग्णालयातील ८ वॉर्डबॉय कामावरून कमी 


चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाची कारवाई 


चंद्रपूर, ता. १० : चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत गैरप्रकार केल्याप्रकरणी ८ वॉर्डबॉय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची कारवाई चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिलेल्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आली. 


बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ९ जून रोजी गैरप्रकार केल्याचा व्हिडीओ वायरल झाला. ही बाब लक्षात येताच महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लगेच चौकशीच्या सूचना दिल्या. वैद्यकीय चमू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनेची वस्तुस्थिती पडताळून बघितली. यात दोषी असलेल्या ८ वॉर्डबॉय कामावरून कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आसरा कोव्हीड रुग्णालयासह महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रशासकीय कामात गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिल्या आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.