Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २१, २०२१

छत्रपती चौक मेट्रो स्टेशनचे कार्य पूर्णत्वाकडे

 छत्रपती चौक मेट्रो स्टेशनचे कार्य पूर्णत्वाकडे



·         प्रताप नगर रिंग रोड ने जुळले २ मेट्रो मार्ग

·         अनेक वस्तीच्या नागरिकांना फायदा

 

*नागपूर २०:*  शहरात नागपूर मेट्रो रेल प्रकल्पा अंतर्गत २ मेट्रो मार्ग ऑरेंज आणि ऍक्वा लाईन वर प्रवासी सेवा सुरु आहे. सिताबर्डी ते आटोमोटिव्ह व सिताबर्डी ते प्रजापती नगर मार्गावर डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस असून जलद गतीने कार्य सुरु आहे. महा मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथील वस्तीना जोडण्याकरिता जुना रिंग रोड महत्वाची भूमिका बजावित आहे. सिताबर्डीलोकमान्य नगर,हिंगना,एयरपोर्टचिंचभवनमिहान येणाऱ्या प्रवाश्याना सहज पणे मेट्रो रेल सेवा उपलब्ध होत आहे.छत्रपती नगर चौक मेट्रो ते जुना रिंग रोड (प्रताप नगर )रचना मेट्रो स्टेशनशी जुळला आहे. या रिंग रोडच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. ज्यामध्ये खामलादेवनगर,जयताळा,भामटी परसोडीस्वालंबी नगरकोतवाल नगर,एनआयटी कॉलोनी,त्रिमूर्ती नगर येथील नागरिकांना ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथील मेट्रो स्टेशन येथे पोहोचणे शक्य आहे. बर्डी,विमानतळ ,मिहान ,बूटीबोरी जाणारे प्रवासी ऍक्वा आणि ऑरेंज दोन्ही मार्गाच्या यात्री सेवेचा लाभ घेत आहे. स्वतः च्या वाहना ऐवजी नागरिक आता मेट्रो ने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहे.

छत्रपती चौक मेट्रो स्टेशन चे कार्य पूर्णत्वाकडे: छत्रपती चौक मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्णत्वाकडे अग्रेसर असून लवकरचया मेट्रो स्थानकावरून प्रवासी सेवा सुरु होणार. स्टेशनचे निर्माण कार्य १२५६८.०० वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आले असून मेट्रो स्थानकांवर कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मरेन वॉटर हार्वेस्टिंगतांत्रिकी खोली,टॉम,एएफओ खोली,लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम),आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंट मध्ये अग्निशामक टॅंक,लिफ्ट,एस्केलेटर्स,टॉयलेटची व्यवस्था असणार आहे. 


छत्रपती नगर चौक बाहेर गावावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यान करता प्रमुख केंद्र आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या सुरुवातील छत्रपती नगर उड्डाणपूलच्या ऐवजी मेट्रो रेलचे पिलर निर्माण कार्यास सुरुवात झाली. छत्रपती नगर चौक ते प्रताप नगर मार्गाने रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशनच्या टी-पॉईंटशी जुळतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूने वस्त्यांनमधील नागरिकांना मेट्रोच्या दोन्ही लाईनचा लाभ मिळत आहे.

राणा प्रताप नगर चौक ते छत्रपती चौक आणि रचना मेट्रो स्टेशन टी पॉईंट चे अंतर बहुतांश समान असल्याने विशेषकर बर्डी,गांधीबाग,रेल्वे स्टेशनबस स्टॅन्डइतवारी आणि पूर्वदक्षिण व उत्तर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांन करिता दोन्ही मार्ग अनुकूल आहे. सुरक्षित आणि आरामदायक विश्व्स्तरीय मेट्रो रेल सेवा मिळाल्याने नागरिक देखील स्वतःच्या वाहना ऐवजी मेट्रो रेल सेवेला प्राधान्य देत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.