गणेश जैन / धुळे
बळसाणे : माळमाथा परिसरातील बळसाणे हे गाव धार्मिक क्षेत्रांनी घेरले आहे तसेच गावाला प्रतिपंढरपूर म्हणून ही ओळखले जाते विठ्ठल मंदिरात सतत वेगवेगळे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होत असतात बळसाणे गावी विविध देव देवतांचे मंदिर आहेत त्यात गावातील मुख्य बाजारपेठेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची नियमितपणे दर्शनार्थ गर्दी असते
मुख्य बाजार पेठेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना इ.स. १९८९ मध्ये करण्यात आली
बळसाणे गावात विठ्ठल मंदिर उभारण्याची संकल्पना प्रखर किर्तनकार जगदगुरु ब्रम्हमुर्ती हभप दामोदर महाराज यांची होती *युगे अठ्ठावीस उभे विठ्ठे वरी* या अभंगाच्या अर्थानुसार मंदिराची उभारणी करण्यात आली आणि आज या परिसरात बळसाणे हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते यामुळे सदर मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे
मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी सोबत राम , लक्ष्मण , सिता , हनुमानाची व बाजूला सप्तशृंगी देवी ची स्थापना हभप दामोदर महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे मंदिराचे पुजारी उमाकांत भट हे दररोज सकाळी मुर्तींना स्नान घालून पूजाअर्चा करतात तसेच मंदिरात पहाटे काकडा आरती होते काकडा आरती ला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहते त्याचप्रमाणे सकाळी १० वाजता पूजा करण्यात येते व सायंकाळी पाच वाजता हरिपाठ होतो दर एकादशी ला भजनीमंडळा तर्फे भजनाचा कार्यक्रम होतो तसेच वर्षातून दोन दा आषाढी आणि कार्तिक एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा करण्यात येते तसेच महिलांचा हरिपाठ , पुरुषांचा हरिपाठ हा कार्यक्रम होतो त्यानंतर दिंडी निघते व प्रसाद वाटप होतो रात्री किर्तनाचा कार्यक्रम होतो कार्तिक महिन्यात तुळशी विवाह सोहळा होतो व मार्च महिन्यात मोठा नाम सप्ताह होतो या नाम सप्ताहात भाविकांना प्रसिद्ध किर्तनकारांची उपस्थिती लाभते त्याचप्रमाणे गावकऱ्यांमार्फत वर्षभर सणासुदीला , सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात गावातील व परिसरातील भाविक नित्याने दर्शनासाठी येतात आषाढी एकादशी निमित्ताने परिसरातील बहुतांश लोक विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात आवर्जून गर्दी करतात व बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थांमार्फत फराळाची व चाय पाण्याची सोय करण्यात येते म्हणून बळसाणे गावातील विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे