Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

धुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मे ३१, २०२१

दारूबंदी उठविली; झळकले निषेधाचे फलक

दारूबंदी उठविली; झळकले निषेधाचे फलक



चंद्रपूरमध्ये महिलांनी मोठ्या लढ्यानंतर दारूबंदी करण्यात यश मिळविले होते. परंतु राज्य सरकारने चंद्रपूर येथील दारू बंदी उठविल्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून येत आहेत. राज्यातील चंद्रपूर येथे असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करीत धुळ्यातील संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकवत राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे.

शुक्रवार, जानेवारी ३१, २०२०

विहीर अनुदानासाठी शेतकऱ्यांना लुटले

विहीर अनुदानासाठी शेतकऱ्यांना लुटले

ग्राम रोजगारसेवक तुषार भामरेचे कारस्थान

धुळे/ प्रतिनिधी
शासनाने मागेल त्यांना शेततळे मागेल त्यांला सिंचन विहीर योजना अंमलात आणली परंतु ह्या योजनेचा देखील फज्जा च झाला शेतकरी राजाला आपल्या मंजूर झालेल्या विहिरीचे अनुदान मिळवण्यासाठी ग्राम रोजगार सेवकाने मागितलेले पैसे द्यावे लागतात हा प्रकार उघडकीस आला असून ह्याबाबत केंद्रीय समिती लक्ष घालणार असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळाली.
सदर प्रकरण धुळे येथील मेहेरगाव गावातील असून नुकतीच त्या विषयी तक्रार नागरिक व शेतकरी ह्यानि केली असून लवकरच सदर ग्रामरोजगार सेवकावर कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच शेतकरी नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यात येतील सदर तुषार भामरे ह्यांनी विहीर अनुदान साठी प्रत्येक शेतकऱ्यांनकडून ६० ते ७० हजार रुपये घेतले असल्याची तक्रार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर प्रकरण केंद्रीय भ्रष्टाचार विरोधी आयोग लक्ष घालणार असून सखोल चौकशी सुरू करण्यात येईल असेही ह्यावेळी सांगण्यात आले.

शनिवार, सप्टेंबर १४, २०१९

जैन समाजाला तब्बल सात वर्षांनी मिळाला अध्यक्ष

जैन समाजाला तब्बल सात वर्षांनी मिळाला अध्यक्ष



शिरपूर येथे समाजबांधवांकडून नवनिर्वाचित संघपती चा सत्कार

ओसवाल जैन समाजा च्या अध्यक्ष पदावर सुवालाल ललवाणी (बबनशेठ) यांची नियुक्ती
 
खबरबात / धुळे, शिरपूर
___________________
    गणेश जैन

शिरपूर : शिरपूर शहरातील ओसवाल जैन समाजाचे तत्कालीन संघपती *ताराचंद डागा* यांच्या निधनानंतर  समाजाचे अध्यक्ष पद साधारणपणे सात ते साडेसात वर्षांपासून रिक्त होते तत्पूर्वी येथील तरुणांनी व जेष्ठमंडळींनी विविध प्रकारच्या संप्रदायातील चार्तुमास आजपावेतो यशस्वी रित्या पार पाडले  व शहरातील प्रसिद्ध व्यापारी धनराज बाफना यांची कन्या डॉ. प्राची बाफना तसेच हंसराज बुरड यांची नात व मुकेश बुरड यांची जुळवा मुली स्नेहा व स्मिता बुरड यांच्यासह बाफना यांनी बालब्रम्हचारीतच संसाराला सोडून जैन धर्माच्या साध्वी पणाचे व्रत धारण केले  त्या तीघी मुली संसारा पासून आलिप्त झाल्यात तीघी मुली उच्चशिक्षित असून देखील त्यांनी अल्पवयातच संसाराचा मोह सोडून जिनशासनाच्या स्वाधीन झाल्या शहरातील भगवती दिक्षा सोहळा सह बाहेरील दोन दिक्षार्थींचा कार्यक्रमाचा अवसर ही शिरपूर श्रीसंघाला मिळाल्याचा आनंद द्विगुणित आहे याकामी बाहेरून हजारो भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येने राहायाची त्यांच्या राहण्यापासून तर अनेक सुविधा येथील तरुणांनी करून दाखवली  समाजा अध्यक्ष नसतांना  देखील समाजाने मोठ्या उत्साहात अनेक मोठमोठे कार्य व विविध संप्रदायाचे चातुर्मास पार पाडले पण समाजामध्ये कर्तबगार व्यक्ती किंवा अध्यक्ष नसल्याची खंत शहरातील जैन बांधवांसह परजिल्ह्यातील समाजबांधवांना देखील तेवढी च वाटत होती अनेकदा समाजाच्या नुतन जैन स्थानकात बैठका झाल्यात विविध विषयांवर समाजबांधवांच्या चर्चा रंगायच्या परंतु आपल्या समाजात मुख्य मालक नसल्याचे कुणाच्या ही तोंडातून शब्द निघत नव्हते बहुतेक जण तोंडात मुंग टाकून गप्प बसल्याचे दिसत होते 
चातुर्मासात बाहेर गावी संताच्या दर्शनाला जावे लागते त्यावेळी स्थानिक लोक बाहेरून आलेल्या अध्यक्षा चे सत्कारासाठी नाव घेतली जातात परंतु समाजात *सुवालालजी ललवाणी* हे जेष्ठ व सतत समाजकार्यात अग्रेसर असल्याने त्यांचे नाव सांगितले जात होते पण ते आधिक्रुत अध्यक्ष नसल्याचे शहरातील समाजबांधवांना यागोष्टीची कल्पना होती 
 गेल्या सात ते साडेसात वर्षापासून समाजात अध्यक्षाची का ? म्हणून नेमणूक केली जायायची नाही याची पुर्व कल्पना येथील समाज बांधवांनाच होती 
  नुतन जैन स्थानकात समाजाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली सदर बैठकीत २०२० चा चातुर्मास विषयावर चर्चा रंगण्या पुर्वी च एका तरुणाला समाजात अनेक वर्षापासून अध्यक्ष नसल्याची खंत वाटत असल्याने बैठकीत सचिन बागरेचा हा तरुण मनोगत व्यक्त करीत असतांना चातुर्मास मांगण्यापुर्वी आपल्या श्रीसंघात अध्यक्ष नसल्याची समज बैठकीत उपस्थितीतांना दिली कुठल्याही संप्रदायाचे चातुर्मास मांगितल्यावर तुमच्या श्रीसंघात अध्यक्ष कोण असे महात्मा व अनेक महानुभव प्रश्न करीत असतात अशा वेळी तोंडातून उत्तर काय देणे हे कळत नाही तरी आपण श्रीसंघात अध्यक्ष म्हणून *सुवालालजी ललवाणी* यांचे नाव बागरेचा या युवकाने सुचविले यावेळी उपस्थित समाजबांधवांच्या  एकमताने ललवाणी यांना संघपती पदासाठी नियुक्ती करण्याचा ठराव पास झाला याप्रसंगी साधुमार्गी संप्रदायाचे अध्यक्ष *विजय बाफना* म्हणाले की अध्यक्ष पदाची निवड किती वर्षाकरिता केली जाते आहे यावर अध्यक्ष पद हे १५ महिन्या करिता ठेवावे व ज्या संप्रदायाचा चातुर्मास असेल त्यावेळी त्या चातुर्मासात त्या संप्रदायाचा अध्यक्ष राहील असे मत बाफना यांनी मांडले याबाबत उपस्थित समाजबांधवांनी सहमत दर्शविल्याचे समजले अध्यक्ष पदावर *सुवालालजी ललवाणी* यांची १५ महिन्याकरिता अध्यक्ष पदासाठी नियुक्ती झाल्यावर सोशलमिडीयाच्या माध्यमातून खांदेशभरातून समाजबांधवांनी ललवाणी यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या व त्यांच्या नियुक्ती ची चर्चा धुळे जिल्हा सह खांदेशात रंगत असल्याचे समाचार हाती येत आहेत त्याचप्रमाणे शिरपूर येथील समाजबांधवांनी त्यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

शनिवार, ऑगस्ट ३१, २०१९

बळसाणे येथील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

बळसाणे येथील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

महापर्युषण पर्वाला सोमवारपासून सुरुवात 




 गणेश जैन / धुळे
बळसाणे : जैन धर्माच्या चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचा गणला जाणारा पर्युषण पर्वाला सोमवार पासून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली तसेच साक्री तालुक्यातील बळसाणे येथील जैन मंदिरांना पर्युषण पर्वा निमित्ताने जैन मंदिराच्या कळसांवर व गाबाऱ्याला विद्युत रोषणाई ने व परिसराला प्रकाशाचा झोतात लखलखीत करण्यात आले आहे रात्री च्या वेळी गाबाऱ्यात दिपकाच्या अग्नी ज्योताने मंदिर शोभून उठते आहे दरम्यान मुर्तीपुजक संप्रदायाचे पर्युषण पर्वाला सोमवार पासून तर स्थानकवासी संप्रदायाचे मंगळवार पासून पर्युषण पर्वाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली व दिगंबर संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सुरुवात २ सप्टेंबर पासून होत आहे.
 पर्युषण पर्वाच्या काळात  येथील मंदिराच्या मुर्तीची अंगी येथील पुजारी मनिशंकर महाराज व अंकित महाराज महाराज यांनी केली 
   गावातील जैन मंदिरात व विश्वकल्याणकाच्या जैन मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली याअंतर्गत विश्वकल्याणकाच्या विमलनाथ भगवानाच्या जैन मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई येथील ट्रस्टी महावीर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तसेच श्रीमती जसुमतिबेन बिपीनभाई शहा हस्ते डॉ. संजयभाई शहा , सुरत व नंदुरबार शहा परिवार मुख्य लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले याठिकाणी ता. २६ आँगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पर्युषणपना निमित्त श्री श्वेतांबर मुर्तीपुजक  जैन श्रीसंघ बलसाणा आणि श्री विश्वकल्याणक जय विमलनाथ भुमी ट्रस्ट , बलसाणा यांच्या तर्फे विविध प्रकाराचे धार्मिक कार्यक्रम पर्युषण पर्वात घेण्यात येतील असे पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज यांनी सांगितले पर्युषण पर्वाच्या पहिल्या च दिवशी विमलनाथ भंगवंताची रेखीव व सुंदर अशी अंगरचना करण्यात आली होती त्याचप्रमाणे मुर्तीला सतत व गाबाऱ्याला सजावटीचे काम रोज सुरू राहील असे ट्रस्ट गणांनी सांगितले व सकाळी ७ वाजता विमलनाथ भगवानाचे व अन्य मुर्तींचे अभिषेक , केशर पुजा , धुप पुजा , स्नात्र पुजा असे नाना प्रकाराचे धार्मिक विधी ने झाले यावेळी गावातील विमलनाथ जैन मंदिराचे पुजारी गिरीश भाई जैन व मनिशंकर भाई जैन व विश्वकल्याणक मंदिराचे पुजारी अंकित भाई जैन व राजेश भाई जैन हे महापर्व काळात परिश्रम घेत आहेत तसेच गावातील कवरलाल छाजेड ,सुभाष जैन , अशोक जैन , भागचंद जैन ,विजय जैन , हेमचंद जैन , दिलीप जैन , शांतीलाल खिंवसरा , शेषमल , छाजेड ,  मोतीलाल जैन , आशिष जैन , गौतम कुंमट , कांतीलाल जैन , किशोर जैन ,  हारकचंद जैन , किरण जैन , अभिषेक जैन , महावीर जैन , पिंटू जैन , राकेश जैन , भुषण जैन ,दर्शन जैन , प्रशांत जैन , योगेश जैन , परेश जैन , संयम जैन , जैनम जैन गावातील जैन समाजाच्या उपस्थित विधी पार पडले यावेळी महिला वर्गाची मोठी गर्दी होती तसेच विश्वकल्याणकाच्या मंदिरात चातुर्मासानिमित्ताने बळसाणे तीर्थाचे तीर्थोध्दारक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महराज व सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज (आदी ठाणा , २ ) यांच्या नेतृत्वाखाली पहाटे , साडेचार वाजता ,  *राई प्रतिक्रमण* दुपारी २:३० वाजता पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज यांचे प्रवचन विश्वकल्याणक येथे , ४ वाजता , *मुनीश्री सोबत धार्मिक चर्चा* ,सायंकाळी सात वाजता *प्रतिक्रमण* आणि रात्री आठ वाजता *भक्ती कार्यक्रम*  भक्ती कार्यक्रम हा एक दिवस गावातील जैन मंदिरात व दुसऱ्या दिवशी विश्वकल्याणक येथील मंदिरात होईल दरम्यान ता. २८ रोजी गावातील जैन मंदिरात विमलनाथ भगवानाची सामुहिक पक्षाल अभिषेक , ता.३०  रोजी , सकाळी आठ वाजता चौदा स्वप्न व पाळणा बोली विश्वकल्याणक येथे संपन्न होणार आहे व दुपारी चार वाजता चौदा स्वप्न , पाळणा बोली चा कार्यक्रम गावातील विमलनाथ जैन मंदिरात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली व ता. १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता बळसाणे गावातील मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होणार असून शोभायात्रे ची सांगता विश्वकल्याणक येथे होणार आहे त्याचप्रमाणे ता. ३ रोजी सामुदायिक क्षमापण कार्यक्रम व बलसाणा जैन श्रीसंघा तर्फे स्वामीवात्सल्य दुपारी बारा वाजता विश्वकल्याणक येथे आयोजित केले आहे असे आवाहन बलसाणा जैन श्री संघाने केले आहे

 *विश्वकल्याणक मंदिरात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल*

ता. २६ रोजी बळसाणे तीर्थोध्दारक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज तथा सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांच्या निश्रायाखाली सुत्रवाचन केले जाते आहे व दुपारी कल्पसुत्र वाचन तसेच दुपारी धार्मिक चर्चा व स्पर्धा , सायंकाळी सात वाजता प्रतिक्रमण व रात्री आठ वाजता प्रसिद्ध संगीतकार आशिष कुमार अँड पार्टी जालना , सध्याच्या परिस्थितीत भाविक धार्मिक भजन ऐकून मंत्रमुग्ध होत आहे  तसेच बळसाणे तीर्थाचे बाल संगीतकार रोनक अँड भुमिका यांचाही भक्तीसंध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे विजय राठोड व कमलेश गांधी , सुरेंद्र टाटीया यांनी सांगितले

बुधवार, ऑगस्ट ०७, २०१९

बळसाणेसह माळमाथेत पाऊस जोरात; पिके कोमात

बळसाणेसह माळमाथेत पाऊस जोरात; पिके कोमात



माळमाथेत २ ते ३ दिवसापासून सुर्यदर्शन नाही

आपल्या साठी घेऊन येत आहोत खबरबात

खबरबात / गणेश कोचर , धुळे
8888965296

बळसाणे : बळसाणेसह माळमाथा परिसरात संततधार होणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पावसाचे पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून नियमितपणे रिमझिम टपकणाऱ्या पावसामुळे उबदार झालेली पिके सडू लागली आहेत. बळसाणे व परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बळसाणे व माळमाथा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. 

बुराई नदी काठाची शेते पाण्याखाली नियमितपणे होणाऱ्या पावसामुळे बुराई नदी काठाची शेते पाण्याखाली गेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी च चंद्रभागा बाई पांडुरंग लोणारी या वयोवृद्ध विधवा महिलेचा लावलेला कापसाची झाड पूर्णतः वाहून गेली आहेत. यापूर्वीची लावलेली झाडे सडू लागली आहे पुराचे पाणी ओसरल्यावर बळसाणे व परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
  

जास्त पावसाने केले उबदार पिकांचे नुकसान साक्री तालुक्यातील बळसाणे व माळमाथा परिसरात १० ते १२ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतातील नानातऱ्हेच्या पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे यागोष्टीचा सर्वाधिक फटका येथील शेतकरी *चंद्रभागा बाई लोणारी या वयोवृद्ध विधवा आजीबाई ला बसला आहे* दरम्यान *बळसाणे , आगरपाडा , कढरे , सतमाने , आयणे , उंभड , नागपूर , फोफरे , घानेगाव , मळखेडा , लोणखेडे , छावडी , म्हसाळे , अमोदे , ऐचाळे , इंदवे , दुसाने , हाट्टी (बु) , हाट्टी (खु) , डोंगराळे आदी माळमाथा भागातील शेतकऱ्यांना बसला आहे*
बुराई नदीच्या परिक्षेत्रात रविवारी झालेल्या जोरदार पावसात बुराईचे पाणी थेट शेतात जाऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यात पिकासह शेतातील मातीही वाहून गेली.  शिवारात  फरशी पाणी थेट शेतात जाऊन पिकासह शेतातील काळी कसदार माती वाहून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली. यात बळसाणे येथील चंद्रभागाबाई पांडुरंग लोणारी या विधवा वयोवृद्ध महिलेची कपाशी पुर्णपणे वाहुन गेली,त्यांच्या मालकीची बळसाणे शिवारातील गट नंबर 257  मधील 32 गुंठा क्षेत्र होते. त्यात त्यांनी शेतात शेणखत, बियाणे, इतर खते व गाळ टाकला होता. त्यात त्यांचे एक ते दोन लाख रुपये खर्च झाले होते. हा झालेला खर्च व येणारे उत्पन्नावर नदीचे पाणी थेट शेतात गेल्याने  मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाली आहे. बुराई नदीला आलेला महापुराने प्रवाहाने नदी विरुद्ध दिशेने वाटचाल केल्याने हे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांसह इतर शेतक-यांनी केली आहे. 
 पिकांमध्ये पाणी साचल्याने कापूस, मका, कांदा, दादर , बाजरी , भुईमूग आदी पिके सडू लागली आहेत याकारणाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव ही वाढला आहे बळसाणे गावातील महिला शेतकरी ग.भा.चंद्रभागा बाई लोणारी यांच्या शेतात पाणी साचल्याने कापसाची झाड जमिनीवर पडली असून ती झाड सडू लागली आहे हे द्रुश्य पाहून वयोवृद्ध महिलेच्या डोळे पाणायला लागले होते. यादरम्यान महसूल विभागाकडून मोहन राठोड यांनी  चंद्रभागा पांडुरंग लोणारी यांचा झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा केल्याचे समजले