शिरपूर येथे समाजबांधवांकडून नवनिर्वाचित संघपती चा सत्कार
ओसवाल जैन समाजा च्या अध्यक्ष पदावर सुवालाल ललवाणी (बबनशेठ) यांची नियुक्ती
खबरबात / धुळे, शिरपूर
___________________
गणेश जैन
शिरपूर : शिरपूर शहरातील ओसवाल जैन समाजाचे तत्कालीन संघपती *ताराचंद डागा* यांच्या निधनानंतर समाजाचे अध्यक्ष पद साधारणपणे सात ते साडेसात वर्षांपासून रिक्त होते तत्पूर्वी येथील तरुणांनी व जेष्ठमंडळींनी विविध प्रकारच्या संप्रदायातील चार्तुमास आजपावेतो यशस्वी रित्या पार पाडले व शहरातील प्रसिद्ध व्यापारी धनराज बाफना यांची कन्या डॉ. प्राची बाफना तसेच हंसराज बुरड यांची नात व मुकेश बुरड यांची जुळवा मुली स्नेहा व स्मिता बुरड यांच्यासह बाफना यांनी बालब्रम्हचारीतच संसाराला सोडून जैन धर्माच्या साध्वी पणाचे व्रत धारण केले त्या तीघी मुली संसारा पासून आलिप्त झाल्यात तीघी मुली उच्चशिक्षित असून देखील त्यांनी अल्पवयातच संसाराचा मोह सोडून जिनशासनाच्या स्वाधीन झाल्या शहरातील भगवती दिक्षा सोहळा सह बाहेरील दोन दिक्षार्थींचा कार्यक्रमाचा अवसर ही शिरपूर श्रीसंघाला मिळाल्याचा आनंद द्विगुणित आहे याकामी बाहेरून हजारो भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येने राहायाची त्यांच्या राहण्यापासून तर अनेक सुविधा येथील तरुणांनी करून दाखवली समाजा अध्यक्ष नसतांना देखील समाजाने मोठ्या उत्साहात अनेक मोठमोठे कार्य व विविध संप्रदायाचे चातुर्मास पार पाडले पण समाजामध्ये कर्तबगार व्यक्ती किंवा अध्यक्ष नसल्याची खंत शहरातील जैन बांधवांसह परजिल्ह्यातील समाजबांधवांना देखील तेवढी च वाटत होती अनेकदा समाजाच्या नुतन जैन स्थानकात बैठका झाल्यात विविध विषयांवर समाजबांधवांच्या चर्चा रंगायच्या परंतु आपल्या समाजात मुख्य मालक नसल्याचे कुणाच्या ही तोंडातून शब्द निघत नव्हते बहुतेक जण तोंडात मुंग टाकून गप्प बसल्याचे दिसत होते
चातुर्मासात बाहेर गावी संताच्या दर्शनाला जावे लागते त्यावेळी स्थानिक लोक बाहेरून आलेल्या अध्यक्षा चे सत्कारासाठी नाव घेतली जातात परंतु समाजात *सुवालालजी ललवाणी* हे जेष्ठ व सतत समाजकार्यात अग्रेसर असल्याने त्यांचे नाव सांगितले जात होते पण ते आधिक्रुत अध्यक्ष नसल्याचे शहरातील समाजबांधवांना यागोष्टीची कल्पना होती
गेल्या सात ते साडेसात वर्षापासून समाजात अध्यक्षाची का ? म्हणून नेमणूक केली जायायची नाही याची पुर्व कल्पना येथील समाज बांधवांनाच होती
नुतन जैन स्थानकात समाजाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली सदर बैठकीत २०२० चा चातुर्मास विषयावर चर्चा रंगण्या पुर्वी च एका तरुणाला समाजात अनेक वर्षापासून अध्यक्ष नसल्याची खंत वाटत असल्याने बैठकीत सचिन बागरेचा हा तरुण मनोगत व्यक्त करीत असतांना चातुर्मास मांगण्यापुर्वी आपल्या श्रीसंघात अध्यक्ष नसल्याची समज बैठकीत उपस्थितीतांना दिली कुठल्याही संप्रदायाचे चातुर्मास मांगितल्यावर तुमच्या श्रीसंघात अध्यक्ष कोण असे महात्मा व अनेक महानुभव प्रश्न करीत असतात अशा वेळी तोंडातून उत्तर काय देणे हे कळत नाही तरी आपण श्रीसंघात अध्यक्ष म्हणून *सुवालालजी ललवाणी* यांचे नाव बागरेचा या युवकाने सुचविले यावेळी उपस्थित समाजबांधवांच्या एकमताने ललवाणी यांना संघपती पदासाठी नियुक्ती करण्याचा ठराव पास झाला याप्रसंगी साधुमार्गी संप्रदायाचे अध्यक्ष *विजय बाफना* म्हणाले की अध्यक्ष पदाची निवड किती वर्षाकरिता केली जाते आहे यावर अध्यक्ष पद हे १५ महिन्या करिता ठेवावे व ज्या संप्रदायाचा चातुर्मास असेल त्यावेळी त्या चातुर्मासात त्या संप्रदायाचा अध्यक्ष राहील असे मत बाफना यांनी मांडले याबाबत उपस्थित समाजबांधवांनी सहमत दर्शविल्याचे समजले अध्यक्ष पदावर *सुवालालजी ललवाणी* यांची १५ महिन्याकरिता अध्यक्ष पदासाठी नियुक्ती झाल्यावर सोशलमिडीयाच्या माध्यमातून खांदेशभरातून समाजबांधवांनी ललवाणी यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या व त्यांच्या नियुक्ती ची चर्चा धुळे जिल्हा सह खांदेशात रंगत असल्याचे समाचार हाती येत आहेत त्याचप्रमाणे शिरपूर येथील समाजबांधवांनी त्यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला