केंद्रीय वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष पी.के. पुजारी व मुख्य नियामक सुशांत चॅटर्जी, राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सदस्य मुकेश खुल्लर व आय.एम. बोहरी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया, पॉवर सिस्टीम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक केव्हीएस. बाबा व इतर मान्यवर
प्रकाशगड मुख्यालयात वीज नियामक आयोगाने घेतली कार्यशाळा
नागपूर/प्रतिनिधी:
शाश्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी सध्याच्या वीज यंत्रणा व त्याच्या व्यवस्थापनामध्ये होणारे बदल पाहता विजेच्या ‘नियम व विनियमनात’ही अनुषंगिक बदल करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय व राज्य वीज नियामक आयोगाकडून संयुक्तरित्या महाराष्ट्रातील सर्व वीज कंपन्यांसोबत शुक्रवारी (दि. 13) महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या ‘नियम व विनियमा’मध्ये महत्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले.
देशाच्या प्रगतीमध्ये वीज क्षेत्राचे स्थान महत्वाचे असून, गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात सरासरी 6 टक्के इतकी वाढ झाली आहे. या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानातील शोध कार्यामुळे पारंपरिक वीज निर्मितीबरोबरच अपारंपरिक वीज निर्मितीमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे.
देशात महाराष्ट्र राज्य हे वीज क्षेत्रात अग्रणी असून, मागील काही वर्षांत महावितरणने यामध्ये सकारात्क बदल करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने होणाऱ्या ‘RealTime Market’ (RTM) आणि ‘Security Constrained Economic Dispatch’ (SCED) या दोन विनियमांबाबत केंद्रीय वीज नियामक आयोग व महाराष्ट्र राज्य् विद्युत नियामक आयोगाने महाराष्ट्रातील वीज कंपन्यांची संयुक्त कार्यशाळा आयोजित केली होती. दोन्ही विनियमनाबाबत त्यांनी वीज कपन्यांच्या सूचना जाणून घेतल्या.
या कार्यशाळेचे औचित्य साधत महावितरणने गेल्या तीन वर्षात विविध ग्राहक उपयोगी सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याबद्दल ची माहिती दर्शवण्याऱ्या "Digital MSEDCL - Making electricity distribution smarter & consumer centred" या पुस्तिकेचे तसेच ग्राहक उपयोगी 'सिटीझन चार्टर'चे देखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अद्ययावत सिटीझन चार्टरची माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून ग्राहकांना नवीन वीज जोडणी, नावात बदल आणि दुरुस्ती, चेंज ऑफ टेरिफ इत्यादी सर्व प्रकारची माहिती संकलित करून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याआधी महावितरणचे सिटीझन चार्टर्ड उपलब्ध होते, त्यात कालानुरूप बदल व अद्यावत करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या कार्यशाळेला केंद्रीय वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष पी.के. पुजारी व मुख्य नियामक सुशांत चॅटर्जी, राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सदस्य मुकेश खुल्लर व आय.एम. बोहरी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया, पॉवर सिस्टीम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक केव्हीएस. बाबा, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन यांचेसह महानिर्मिती, बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आदी वीज कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.