Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर २९, २०१७

एल्फिन्सटन स्टेशन चेंगराचेंगरीत 22 ठार,






मुंबई - येथील वेस्टर्न रेल्वे लाइनवरील एल्फिन्सटन स्टेशनवर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय रेल्वेमत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील कार्यक्रम रद्द करुन केईएम हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे.
- एल्फिन्सटन रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत.
24136051
24107020
24131419
- मिळालेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीची घटना सकाळी 10.45 वाजता घडली. या पुलावर सामान्यपणे रोज सकाळच्या वेळी गर्दी जास्त असते. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेला जोडणारा हा पुल असल्यामुळे येथे नेहमी गर्दी असते. दरम्यान, उद्या दसरा असल्यामुळे दादर स्टेशनवर गर्दी जास्त असेल, यामुळे अनेक प्रवासी हे एलफिन्स्टन आणि परळ स्टेशनवर उतरत होते. त्यातच पुलाचा एक भाग कोसळल्याची अफवा पसरली आणि भयभीत लोकांनी पुलावरुन उडी मारण्याच्या प्रयत्न केला आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली.
- अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस आणि स्थानिक लोकप्रतनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे एलफिन्स्टन स्टेशनजवळ पोहोचले आहेत.
- पुल कोसळला, शॉर्ट सर्किट झाले अशा अफवा पसरल्यामुळे लोकांनी धावाधाव केल्याचे सरवणकरांनी सांगितले. या अफवांमुळे चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी अशा प्रकारची घटना झाली आहे. आता तरी केंद्र सरकार सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबई लोकलकडे लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
- हा पूल रेल्वेचा असून अरुंद पुलामुळे सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी होते. परळ भागात कार्यालयांची संख्या मोठी असल्याने या स्थानकावर उतरणाऱ्यांची संख्या जास्त असते. पुलावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मदत घेतल्या जाते.
- तीन वर्षापूर्वी या पुलाचे रुंदीकरण करण्याचे ठरले होते पण अजूनही ते कागदावरच आहे. हा पूल मध्य रेल्वेच्या परळ आणि पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन स्टेशनला जोडणारा आहे. या पुलावरुन रोज लाखो प्रवासी ये-जा करतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.