मायणी ःता.खटाव, जि.सातारा(सतीश डोंगरे)
मायणीत श्री संत सदगुरू मातोश्री सरूताई माऊली देवस्थानच्या गोशाळेत पार पडला आनोखा कार्यक्रम प्राण्यांना जपले पहिजे. गाय व माणसाची शरीर रचना सारखीच असुन गायीची प्रसुती सुध्दा नऊ महिने नऊ दिवसांनी होते. जशी गर्भवती महिलेची काळजी घेतली जाते. अगदी त्याच
प्रमाणे मायणी तील श्री.संत सदगुरू मातोश्री सरूताई माऊली चँरिटेबल ट्रस्ट श्री क्षेत्र मायणी यांनी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या गोशाळेतील राणी, व गौरी या पैकी राणी
गभर्वती गायीच्या डोहळ्याचा कार्यक्रम आयोजीत करून फळे, पेंड, घास देवुन महिलांची ओटी भरली. गभर्वती गायीची काळजी घेतली तर वासरं ही सशक्त होतात म्हणून या डोहाळ जेवनातुन माता- बाल संगोपनाचा संदेश या ट्रस्ट ने दिला आहे.
आणलेल्या राणी गाईला सातवा महिना लागल्याने या गाईचे डोहाळे काढण्यासाठी ट्रस्ट चे सचिव रवींद्र बाबर दादा व ट्रस्ट चे पदाधिकारी यांनी गायीच्या डोहाळ्याचा कार्यक्रम आयोजीत केला. विविध प्रकारची फळे, पेंड, घास देऊन डोहाळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांची ओटी भरण्यात आली . त्यानंतर नवी साडी ,चोळी भेट देवुन फराळ व कैरी पन्हे ही देण्यात आले. सोहळ्यात देवस्थान ट्रस्ट व महिला वर्ग मेहनत घेत होते. गाईचे महत्व देव म्हणून असले तरी ती आपले शेत व आरोग्य यासाठी अमृत आहे हे नक्की म्हणून तिचे डोहाळे काढण्यासाठी या सर्व महिला नी पुढाकार घेतला. मायणी पंढरपूर रोड वरील सरूताई मठात हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास मायणी भागातील महिला उपस्थीत होत्या.