Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सातारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सातारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

 मराठ्यांची राजधानी साताऱ्याचा देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे होणार गौरव #Satara

मराठ्यांची राजधानी साताऱ्याचा देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे होणार गौरव #Satara


साताऱ्याचा गाैरव : नवी दिल्लीत 26 जानेवारीच्या परेडमध्ये कास पठारचा चित्ररथ

सातारा | नवी दिल्ली येथे 26 जानेवारीसाठी परेडमध्ये चित्र रथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथावर कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरणार आहे.

प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथील परेडमध्ये प्रत्येक राज्याचे चित्ररथ असतात. या चित्ररथामधून प्रत्येक राज्य आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. यंदा दिल्ली येथे होणार्‍या परेडमध्ये राज्याची समृद्ध जैवविविधता दाखवणे या उद्देशाने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. मुख्य मॉडेल कास पठाराचे असेल जे चित्ररथाच्या अग्रभागी मध्यभागी ठेवले जाईल.

कास पठाराला फुलांची व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम घाटावरील जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणून 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को)ने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ घोषित केले होते. हे विविध प्रकारच्या हंगामी वन्य फुलांसाठी आणि स्थानिक फुलपाखरांच्या प्रजातींसाठी ओळखले जाते. कास पठार 10 चौरस किमी परिसरात पसरलेले आहे. फुलांच्या 850 पेक्षा जास्त प्रजाती या पठारावर आढळून येतात. ज्यात ऑर्किड, झुडूप आणि मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. त्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे.




कास पठारा प्रमाणेच मालढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातींचे मॉडेल देखील असणार आहेत. याशिवाय वाघ, फ्लेमिंगो, मासे, गिधाड आणि घुबडाचे मॉडेल असणार आहेत. शेकरू हा राज्यप्राणी तर हरियाल हा कबूतर राज्यपक्षी आहे. ‘ब्लू मॉर्मन’ हे राज्य फुलपाखरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याच्या चित्ररथात फुलपाखराचे आठ फूट उंच आणि सहा फूट रुंद मॉडेल असेल. मॉडेल घेऊन जाणार्‍या स्टेजला जारुल आणि ताम्हण या राज्य फुलांनी सुशोभित केले जाणार आहे.

सोमवार, सप्टेंबर १४, २०२०

श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन




राज्यसभेचे खासदार राजे उदयनराजे भोसले यांचे
काका माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी श्री. छ. चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सातारा येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते.
सातारा शहरातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता, आमचे काका माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी आमच्या काकी श्री. छ. चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सातारा येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते.

मंगळवार, एप्रिल ०७, २०२०

मायणी ग्रामपंचायतकडून आता कडक सुरक्षा

मायणी ग्रामपंचायतकडून आता कडक सुरक्षा



मायणी ता. खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)
मायणी ग्रामपंचायत वतीने कोरोना विषाणूच्या विरोधात सुरुवातीपासून पाउले उचलली असली तरी अद्यापही दहा टक्के लोक बेफिकीर राहत असल्याने व आरोग्याची काळजी घेत नसल्याने मायनी ग्रामपंचायती च्या वतीने आता कडक सुरक्षा जारी करणार आहे अशी माहिती युवा नेते सचिन गुदगे यांनी दिली याचा एक भाग म्हणून संपूर्ण गावात परगावी असणारे बरेच लोक गावात आले आहेत अनेकजण भयभीत झाले आहेत तर अनेक जण बेफिकीर रस्त्यावर फिरत आहेत त्यासाठी पुन्हा एकदा सोडियम हैपो क्लोराईड फरून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे अनेक संशयित रात्रीच्या वेळी परगावाहून येत आहेत त्यांच्यावर करडी नजर ग्रामपंचायत सदस्य व गावातील पोलीस पाटील व सामाजिक संस्था पोलीस मित्र व पोलीस आधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून त्याची माहिती घेऊन त्यांना लगेच मेडिकल टेस्ट साठी दवाखान्यात पाठवली जात आहे तसेच भाजीपाला फळे विक्रीसाठी दररोजची मंडई बंद केली असून भाजीपाला फळे विक्रेत्यांना पोलीस स्टेशनच्या मदतीने फिरून फळे भाजीपाला विक्रीस परवानगी दिली आहे अत्यावश्यक सेवा मेडिकल किराणा यांच्यासाठी दुकानाबाहेर तीन फूट अंतरावर चौकोन तयार करून वितरण व्यवस्था सुरू केली आहे तसेच एखाद्या दुकानदाराला याचा फायदा घेऊन चढ्या दराने विक्री करीत असेल तर ते दुकान कायमचे बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे विनाकारण गाडीवर फिरणाऱ्या ना आदल घडावी म्हणून त्यांच्या गाडी पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात येत आहेत तसेच रेशन दुकानदारावर करडी नजर ठेवली असून जर तक्रार असेल आणि त्यात तथ्य असेल तर दुकानदारांचे परवाने रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना कळविण्यात येईल प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी आपापला प्रभाग मध्ये लक्ष ठेवून त्यांना योग्यती मदत पुरवण्याचे असून तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान युवा नेते सचिन गुदगे यांनी केली आहे.

शुक्रवार, एप्रिल ०३, २०२०

ज्योतिष शास्त्रातील सर्व उत्कृष्ट कार्याबद्दल अॅड. श्रीराम देव सन्मानित

ज्योतिष शास्त्रातील सर्व उत्कृष्ट कार्याबद्दल अॅड. श्रीराम देव सन्मानित





मायणी ता.खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)
ज्योतिषशास्त्र हे प्राचीन शास्त्र असले तरी ते खगोलशास्त्र अश्नात्म.एशास्त्र विज्ञान यांच्याशी त्याची सांगड आहे सध्याच्या काळात विवाह जमणे अवघड आणि जमलंच तो टिकणे फार अवघड सध्या न्यायालयात अनेक घटस्फोटांची प्रकरणी निलंबित आहेत पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणाची संख्या प्रत्येक पटीने वाढली आहे यासाठी प्रथम सल्ला मार्गदर्शन व नंतर समुपदेशन या समुपदेशनाने अनेकांचे संसार पुन्हा उभारा राहिले आहे ॲड. डॉ. श्रीराम भालचंद्र देव यांनी न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर सल्ला मार्गदर्शन व नंतर समुपदेशन करून विनामूल्य सेवा गेली पंचवीस वर्षे देत आहेत याबद्दल भागवत गीता अभ्यासक श्री पारेकर शास्त्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रख्यात ज्योतिषी विजय जकातदार यांच्या हस्ते व ग्राहसंकेत विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीधर कुलकर्णी यांच्या समवेत अँड. श्रीराम देव यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी भगवद्गीता अभ्यासक ला.कु. पारेकर शास्त्री बहुमानाची भास्कर आदित्य ही पदवी सदरच्या विद्यालया कडून बहाल करण्यात आली याप्रसंगी ज्योतिष अभ्यासक सौ आरती अमर घाटपांडे, श्री नंदकुमार जोशी खटाव ,प्रध्यापक दिलीप पुस्तके मयुरेश रिसबूड, अनिरुद्ध जेरे, तसेच ग्रहा संकेत विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते शेवटी नंदकुमार जोशी यांनी आभार मानले

बुधवार, एप्रिल ०१, २०२०

कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होळीचागाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होळीचागाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम





होळीचे गाव येथे सायकल वरून कोरणा संदर्भात जनजागृती करताना ग्रामपंचायत शिपाई मारुती होवाळे.

कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायकल वरून जनजागृती

मायणी,ःता.खटाव.जि.सातारा(सतीश डोंगरे)
संपूर्ण देशामध्ये वेगाने व्हायरल होत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश पातळीवरून राज्य पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच शहरी भागातील लोकांची खेड्याकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे गावातील ग्रामपंचायत चे काम वाढल्याचे दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या मार्फत विविध योजना राबवून कोरानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहेत
यातच होळीच्या गाव येथील ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करण्यासाठी सायकलवर स्पीकर ठेवून जनजागृतीचे काम करण्याचे सुरु केले आहे यामध्ये गावातील ग्रामपंचायत मधील शिपाई सायकलवर छोटा स्पीकर ठेवून संपूर्ण गावामध्ये फेरी मारून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे यावेळी या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की घाबरून जाऊ नये याची काळजी घ्यावी जे लोक आले आहेत त्यांनी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच गावातील लोकांना सहकार्य करावे विनाकारण गर्दी करून थांबू नये घरांमध्ये रहावे अशा प्रकारचे आव्हान ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.