मायणी ता. खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)
मायणी ग्रामपंचायत वतीने कोरोना विषाणूच्या विरोधात सुरुवातीपासून पाउले उचलली असली तरी अद्यापही दहा टक्के लोक बेफिकीर राहत असल्याने व आरोग्याची काळजी घेत नसल्याने मायनी ग्रामपंचायती च्या वतीने आता कडक सुरक्षा जारी करणार आहे अशी माहिती युवा नेते सचिन गुदगे यांनी दिली याचा एक भाग म्हणून संपूर्ण गावात परगावी असणारे बरेच लोक गावात आले आहेत अनेकजण भयभीत झाले आहेत तर अनेक जण बेफिकीर रस्त्यावर फिरत आहेत त्यासाठी पुन्हा एकदा सोडियम हैपो क्लोराईड फरून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे अनेक संशयित रात्रीच्या वेळी परगावाहून येत आहेत त्यांच्यावर करडी नजर ग्रामपंचायत सदस्य व गावातील पोलीस पाटील व सामाजिक संस्था पोलीस मित्र व पोलीस आधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून त्याची माहिती घेऊन त्यांना लगेच मेडिकल टेस्ट साठी दवाखान्यात पाठवली जात आहे तसेच भाजीपाला फळे विक्रीसाठी दररोजची मंडई बंद केली असून भाजीपाला फळे विक्रेत्यांना पोलीस स्टेशनच्या मदतीने फिरून फळे भाजीपाला विक्रीस परवानगी दिली आहे अत्यावश्यक सेवा मेडिकल किराणा यांच्यासाठी दुकानाबाहेर तीन फूट अंतरावर चौकोन तयार करून वितरण व्यवस्था सुरू केली आहे तसेच एखाद्या दुकानदाराला याचा फायदा घेऊन चढ्या दराने विक्री करीत असेल तर ते दुकान कायमचे बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे विनाकारण गाडीवर फिरणाऱ्या ना आदल घडावी म्हणून त्यांच्या गाडी पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात येत आहेत तसेच रेशन दुकानदारावर करडी नजर ठेवली असून जर तक्रार असेल आणि त्यात तथ्य असेल तर दुकानदारांचे परवाने रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना कळविण्यात येईल प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी आपापला प्रभाग मध्ये लक्ष ठेवून त्यांना योग्यती मदत पुरवण्याचे असून तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान युवा नेते सचिन गुदगे यांनी केली आहे.