भद्रावती:(शिरीष उगे) जगासह संपूर्ण देशात कोरोनाची महामारी सुरु असताना संचारबंदीच्या काळात पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत येणाऱ्या बरांज तांडा परिसरात हातभट्टीवर दारू काढत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना आज दि. 6 एप्रिल 2020 ला सकाळी मिळाली होती व त्या ठिकाणी धाड टाकून ६,२६,००० च्या किमतीची हातभट्टी दारू जप्त केली आहे. यावेळी घटनास्थळावरून आरोपी फरार झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत आहे.
देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना या महाभयंकर विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चंद्रपुर जिल्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्यातहीसुद्धा संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे या संचारबंदी बंदीच्या काळात सुद्धा भद्रावती तालुक्यात दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र या घटनेवरून दिसून येत आहे.
भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सिंग पवार यांना हातभट्टीची दारू काढत असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह धाड टाकली. घटनास्थळी ड्रम मधील हातभट्टीची दारू, दारू काढण्याचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध आणि कारवाही भद्रावती चे ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्मा, पोलिस उपनिरीक्षक तुळजेवार करत आहे.