सूचना
उपरोक्त संदर्भिय वाचा आदेशान्वये, चंद्रपूर जिल्हयात कोरोना विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत जेणेकरुन कोरोना विषाणुंचा वाढता प्रभाव आटोक्यात येईल. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्हयातील जिवनावश्यक वस्तु विक्री व वितरण (भाजीपाला/किराणा सामान/दुध/ब्रेड/फळे/अंडी/मांस/मत्स्य/बेकरी/पशु खाद्यांची दुकाने) या सर्व आस्थापना/ दुकाने दिनांक 24.03.2020 ते दिनांक 31.03.2020 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत सुरु ठेवण्यात आलेली होती.
चंद्रपूर जिल्हयातील खालीलप्रमाणे वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना/ दुकाने दिनांक 07.04.2020 ते दिनांक 14.04.2020 पावेतो खालीलप्रमाणे ठरवुन देण्यात आलेल्या वेळेत सुरु राहतील.
1). जिवनावश्यक वस्तु विक्री व वितरण जसे भाजीपाला/किराणा सामान/दुध/ब्रेड/फळे/अंडी/ मांस/मत्स्य/बेकरी/पशु खाद्यांची दुकाने) या सर्व आस्थापना/दुकाने दररोज सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहील
. 2). इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स गुडस व मोबाईल विक्री/वितरण व दुरुस्ती इत्यादी आस्थापना/दुकाने फक्त मंगळवार व शुक्रवार सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहील.
3)स्टेशनरी व जनरल गुडस वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना/दुकाने फक्त सोमवार व बुधवार सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहील.
4)हार्डवेअर संबधीत वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना/दुकाने फक्त रविवारी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहील.
5)कापड दुकाने वस्तु विक्री व वितरण तसेच लाँड्री इत्यादी आस्थापना/दुकाने फक्त शनिवारी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहील.
उपरोक्त आदेशाचे पालन व्हावे जर एखादी आस्थापना/दुकाने ठरवुन देण्यात आलेल्या दिवस व वेळेनंतर सुरु राहील्यास संबधीत आस्थापना/ दुकानदार यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897, भारतीय दंड संहिता चे कलम 188, 269, 270, 271 अन्वये कार्यवाही करण्यात येईल..
सदर आदेशान्वये आस्थापना/दुकानदार यांनी आपले आस्थापनेवर/दुकानात एका वेळेस दोन पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच दोन ग्राहकांमध्ये एक मीटर चे अंतर ठेवावे त्याकरिता आस्थापना/दुकाने यासमोर एक मीटर अंतरावर मार्कीग करावी त्याचप्रमाणे सॅनीटायजर/साबणाने हात धुण्याची व्यवस्था असावी. सदर आदेशाचे भंग झाल्यास संबधीत व्यक्तींवर (ग्राहक/दुकानदार) यांचेवर कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
(डॉ. कुणाल खेमनार) जिल्हादंडाधिकारी,चंद्रपूर