Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै ०८, २०१९

बळसाणे तीर्थोध्दारख जैनमुनिंच्या चातुर्मासाची जय्यत तयारी



११ जुलैला परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन महाराजांचे बळसाणे तीर्थावर होणार जल्लोषात प्रवेश

 खबरबात, गणेश जैन / धुळे*

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे हे गाव जैन धर्मियांचे तीर्थस्थान म्हणून जगभर प्रसिद्ध आहे जैन तीर्थाला प्रसिद्ध करण्याचे श्रेय व देवलोक गमन तीर्थोध्दारख परमपूज्य आचार्य भगवंत विद्यानंदसुरीश्वजी महाराज यांचे होते परमपूज्य आचार्य भगवंतांनी बळसाणे हे गाव जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून कसे प्रसिद्ध होईल याबाबत महाराजांनी मोठी खटाटोप केली होती देवलोक गमन आचार्य मुनिंचे गुजरात , मध्यप्रदेश आदी राज्यातील चातुर्मासात फक्त समाजबांधवांना बळसाणे तीर्थावर लक्ष केंद्रित राहायचे असलेल्या चातुर्मासाच्या स्थळातुन भाविकांना बळसाणे जैन तीर्थावर विमलनाथ च्या दर्शनार्थ अग्रहीत करून ट्रँव्हेल्स ने पाठवत राहायचे परंतु त्यांनी जैन समाजाच्या मोठमोठ्या ला सावकरांना धरून दुसाने रोडावरील जमीन खरीद ली आणि त्याक्षेत्राला विश्वकल्याणक तीर्थ म्हणून नावाचे स्वरूप दिले तसेच विमलनाथाची सेकण्ड मुर्ती तयार करून  त्या नव्या जैन मंदिरात स्थापना करण्यात आली व शंखेश्वर , पालीताणा सारखे भव्य तीर्थ उभारण्याचे आचार्य मुनिंनी विडाच उचलला होता त्यांच्या निश्रायाखाली मंदिराचे बांधकाम चालू असताना त्यांचे मुंबई येथील खासगी रुग्णालयात दुखद निधन झाले त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे सुशिष्य परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन महाराज यांना त्यांची गादी मिळाली या महाराजांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तीर्थाला घडवण्याचे मोठे प्रयत्न केले आतापर्यंत त्यांच्या निश्रायाखाली सुसज्ज अशी भक्तनिवास व साधुसंतांची राहण्यासाठी उपाश्रय बांधले व अजून देखील मोठ्या प्रमाणात या परिसरात जोरात काम चालू आहे त्यासाठी विश्वकल्याणक ट्रस्टगण ही परीश्रम घेतांना दिसून येत आहे 
 बळसाणे गावाचे नाव राज्यातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध करून दाखवले आणि अशाच परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचे प्रथमतः च मंगलमय चातुर्मासाची समाजबांधवांकडून व समस्त गावकऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे

  *बळसाणे नगरीत चातुर्मासा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम*

११ जुलै रोजी महाराजांचे बळसाणे तीर्थावर कळसधारी महिला व भजनीमंडळ , लेझीम पथक , वाजतगाजत भव्य शोभायात्रा सकाळी काढण्यात येणार आहे शोभायात्रे ची सुरुवात गावादारा पासून ते वाजतगाजत गावातील जैन मंदिरात विमलनाथ भगवंताचे दर्शन व मंगलपाठ करून पुन्हा त्याच मार्गाने विश्वकल्याणक येथे शोभायात्रे ची सांगता होणार असल्याची माहिती बळसाणे विश्वकल्याणक ट्रस्टी व ग्रा.पं.सदस्य महावीर जैन यांनी खबरबात ला दिली त्याचप्रमाणे चार महिन्याच्या चातुर्मासात धार्मिक विधी , जप तपाला सुरुवात होईल व रोज प्रवचन होईल सुज्वळ स्वभावाचे परमपूज्य कुलवर्धन महाराज यांचा प्रवचन ऐकण्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.