Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै ०९, २०१९

घराची भिंत पडली; सहा जणांची अग्निशमन दलाकडून सुटका pune




दत्ताञय फडतरे (पुणे ) - शहरात दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे पुलगेट बसस्थानक, साईबाबा मंदिराशेजारी असलेल्या एका जुन्या दुमजली घराची भिंत व लगतच घरामधे असलेला जिना पडल्याने त्या कुटूंबातील एकुण सहाजणांना वरच्या मजल्यावरुन अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर व शिडीच्या साह्याने खाली उतरवत त्यांची सुखरुप सुटका केली. यामधे जेष्ठ महिलेसह दोन लहान मुलांचा देखील समावेश होता. 

या कामगिरीमधे केंद्र प्रमुख प्रमोद सोनावणे, वाहन चालक मेहबूब शेख, तांडेल राजेंद्र पायगुडे व जवान राहूल नलावडे, संदिप घडशी, संजय सकपाळ, अतुल खोपडे तसेच पुणे कँन्टोमेंट अग्निशमन जवानांनी सहभाग घेतला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.