Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २९, २०२२

श्री जगदंबा देवस्‍थानासाठी ४ कोटी रू. निधी वितरीत |

केळापूरच्‍या श्री जगदंबा देवस्‍थानाच्‍या ठिकाणी विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत


सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनोखी भेट

राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने यवतमाळ जिल्‍हयातील जगदंबा संस्‍थान केळापूर येथील विविध विकासकामांकरिता मंजूर ५ कोटी रू. निधी पैकी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाने दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा संस्‍थानच्‍या भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनुपम भेट दिली आहे.


यवतमाळ जिल्‍हयातील पांढरकवडा तालुक्‍यातील जगदंबा संस्‍थान केळापूर हे अतिशय जागृत देवस्‍थान आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्‍ये या धार्मीक स्‍थळाच्‍या ठिकाणच्‍या विविध विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला होता. मात्र या विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी अप्राप्‍त होता. हा निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तब्‍बल दोन वर्षे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. विधानसभेत संसदीय आयुधांच्‍या माध्‍यमातुन देखील हा मुद्दा त्‍यांनी रेटला. अखेर दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये जगदंबा संस्‍थान येथील विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. याठिकाणी भक्‍त निवास, फर्निचर, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता, आंतर व बाह्यविद्युतीकरण, अग्‍नीशमन व्‍यवस्‍था, अंतर्गत रस्‍ते बांधकाम, सिमेंटकॉंक्रीट नाली बांधकाम, वातानुकुलीकरण, आर. ओ. सिस्‍टीम, सिसिटिव्‍ही सिस्‍टीम, वृक्ष लागवड, ट्री गार्ड आदी व्‍यवस्‍थांचा अंतर्भाव आहे.


मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने श्री जगदंबा संस्‍थान येथे येणा-या भाविकांसाठी या माध्‍यमातुन सोयीसुविधा उपलब्‍ध होणार असून, यंदाच्‍या नवरात्रोत्‍सवात भाविकांना त्‍यांच्‍या माध्‍यमातुन अनोखी भेट देण्‍यात आली आहे. The remaining Rs. 4 crore for various development works at Sri Jagdamba Devasthana in Kelapur. Funds disbursed


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.