पर्यटन संकुलाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे - सुनील तरोणे
नवेगावबांध येथे वृक्षारोपण करून मैत्री दिन साजरा
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.4 ऑगस्ट:-
नवेगावबांध चे पर्यटन संकुलाचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुनील तरोणेन यांनी केले आहे. ते येथील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलातील हिल टॉप गार्डन येथे दिनांक एक ऑगस्ट रोज रविवारला दुपारी तीन वाजता आयोजित
मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे, सडक अर्जुनी पंचायत समितीच्या माजी सभापती कविता रंगारी, दलित मित्र महजबीन राजानी, उद्योगपती नितीन पुगलिया, रामदास बोरकर, संजीव बडोले, विजय डोये, परेश उजवणे, नवल चांडक, बाबुराव नेवारे, धनश्री गभणे, मंगला साखरे उपस्थित होत्या. मानवी मैत्री सर्वश्रुतच आहे. परंतु वृक्षांशी ही मैत्री केली पाहिजे. वृक्ष आपल्याला प्राणवायू, फळे, मानवी जीवनात उपयोगी लाकडे देत असतात. त्यामुळे आजच्या या आधुनिक युगात वृक्षांशी मैत्री करणे अटळ आहे. असे सुनील तरोणे पुढे आपल्या भाषणात म्हणाले. रामदास बोरकर यांनी हिल टॉप गार्डनच्या निर्मितीचा इतिहास उपस्थिता पुढे मांडून, राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन, पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्धी कशी होईल? याकडे लक्ष केंद्रित करण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन केले. पर्यटन संकुल मार्ग ते हिलटॉप गार्डन या रस्त्यावर व परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.