Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २१, २०२३

साक्षगंध आटोपला; भावी पत्नीला भेटून परताना तरुणाचा आईसह मृत्यू | Accidnet news

  टीप्परच्या धडकेत सिंदेवाहीतील मायलेकाचा जागीच मृत्यू  


accident news दुचाकी व चारचाकी वाहनाला विरूध्द दिशेने  तळोधी (बा.) कडून नगभिड कडे जाणाऱ्या टीप्परने जबर धडक दिली. यामध्ये मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. वडील गंभीर तर मोठा मुलगा किरकोळ जखमी झाला.  ही घटना आज रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. आई कल्पना रमाकांत कड्यालवार व मुलगा साहिल उर्फ बंटी रमाकांत कड्यालवार (30) असे मृतक मायलेकाचे नाव आहे. मूळचे नवरगावचे सद्या सिंदेवाही येथे राहत होते. (Latest News on Maharashtra Road Accident)

 काल शनिवारी सिंदेवाही येथील कड्यालवार कुटुंबातील वडील पांडुरंग, आई कल्पना, मोठा मुलगा समीर व लहान मुलगा साहिल असे चौघेजण नागपुला  बुलेट गाडी विकत घेण्यासाठी गेले होते. नागपुरात दुचाकी विकत घेतल्यानंतर ते भिवापूर मार्गे सिंदेवाहीला परत येण्यासाठी निघाले होते. दरम्यान साहिल याचा काही दिवसापूर्वी भिवापूर येथील मुलीशी विवाह जोडलेला आहे. त्याचा साक्षगंधही आटोपला आहे. नागपूरवरुन परत येत असताना लहान मुलगा साहील हा आपल्या कुटुंबियासमवेत भिवापूर येथे सासुरवाडीला थांबला. त्या ठिकाणी जेवण करून सर्व कुटुंबीय सिंदेवाही मार्गे रात्री अकरा वाजताचे सुमारास पुन्हा सिंदेवाहि कडे निघाले. 


चारचाकी वाहनात वडील पांडुरंग व मोठा मुलगा समीर बसले.  तर बुलेट दुचाकीने लहान मुलगा साहिल व  आई कल्पना हे दोघे निघाले. दोन्ही वाहने जवळच्या अंतराने येत होती. दरम्यान ज्या बुलेटने साहिल व आई येत होते ती दुचाकी भिवापूर वरुन गावी येत असताना रस्त्यात  अधेमध्ये बंद पडत होती.  नागभीड ते तळोधी (बा.) मार्गावरील पलसगाव (खुर्द) पुलावर साहिलची दुचाकी रात्री साडेबाराच्या सुमारास बंद पडली. त्यामुळे आई व मुलगा पुलावर थांबले होते.  लगेच मोठा मुलगा समीर व वडील चारचाकी वाहनाने मागून आलेत. बंद पडलेल्या दुचाकीला पाहत असताना विरूध्द दिशेने तळोधी (बा.) कडून  भरधाव आलेल्या टिप्परणे दुचाकीसह  साहिल व आई कल्पना ला जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की पुलाचा कटडा तुटून आई व मुलगा पुलाखाली पडले. यामध्ये लहान मुलगा साहिल व आई कल्पना जागीच ठार झाले. त्यानंतर टीप्परची धडक चारचाकी वाहनाला बसली. त्यामधील वडील पांडुरंग  गंभीर तर मोठा मुलगा समीर किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर चालक टीप्पर घेउन घटनास्थळावरून पसार झाला.  गंभीर जखमी वडील पांडुरंग यांना ब्रम्हपुरी ला उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कड्यालवार कुटुंबिय मूळचे नवरगाव येथील होते. परंतू काही वर्षापूर्वी सिंदेवाही येथे घर बांधल्याने ते सद्या  सिंदेवाही निवासी  झाले होते. road accident news today


मृतक मुलगा साहिल याचा विवाह भिवापुर येथील मुलीशी जुळलेला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा साक्षगंधही आटोपला होता. येत्या दिवसात विवाह होणार होता. लग्नाची तयारी सुरू झाली होती. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू व दोघे जखमी झाल्याने कड्यालवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.