स्थानिक समता विकास मंडळ, चंद्रपूर तर्फे बाल शिबीर - २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर दि. ७ मे २०२३ ते १४ मे २०२३ पर्यंत घेण्यात आले. वय ७ ते १४ वयोगटातील बालकांनी यात सहभाग घेतला होता.
सकाळी ६.०० वाजता ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येत होते यात सकाळी ६.०० वाजता सर्व मुलांना ज्युबिली शाळेच्या पटांगनावर चला मैदानावर.... या अंतर्गत विविध कवायती, वार्म अप, अॅथलेटीक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट व इतर मैदानी खेळाची माहिती देण्यात येवून खेळविण्यात येत होते. त्यांनतर सकाळी ठिक ९.०० वाजता त्यांना नाश्ता देण्यात येत होता, सकाळी ९.३० वाजता बुध्दवंदना व आनापान ठिक १०.०० वाजता व्यक्तीमत्व विकास, सामान्य ज्ञान विषयी माहिती देण्यात येत होती ठिक ११.०० वाजता नृत्यकला १२.३० वाजे पर्यंत शिकवण्यात येवून दिवसाच्या शिबीराची सांगता होत होती.
संपूर्ण निशुल्क हे शिबीर संपूर्ण सात दिवस घेण्यात आले यात सकाळी चला मैदानावर अंतर्गत श्री. साहिल चहारे, श्री. विनोद पुणेकर, अमर रामटेके यांनी मार्गदर्शन केले, आनापान सौ. संगीता अलोने यांनी घेतला तर व्यक्तीमत्व विकास साठी श्री. बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर, श्री. अमित वाकडे, श्री. प्रविण कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तर नृत्य कले साठी श्री. आशिष राहुलगडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या संपूर्ण शिबीराचे व त्याअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक १६ मे २०२३ ला घेण्यात आले. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आद. सुभाष भाऊ शिंदे, अध्यक्ष डेबू सावली वृध्दाश्रम व संचालक विप्लव ज्वेलर्स हे होते तर साहिल चवरे, अमित वाकडे, प्रविण कांबळे, विनोद पुणेकर, आशिष राहुलगडे यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन रामटेके, अध्यक्ष समता विकास मंडळ हे होते, संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन परिमल रामटेके व आभार पराग चुनारकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन रामटेके यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे सचिव पराग चुनारकर, प्रणय रामटेके, प्रतीक रंगारी, शांतीसागर भगतकर, अमर रामटेके, जय रायपुरे, निशांत चिकाटे, सचिन रामटेके, रोहीत भगतकर, राहुल रामटेके, नयन अलोने, समय बारसिंगे, पवन रामटेके यांनी परिश्रम घेतले.