Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, मे ०६, २०२३
सोमवार, जानेवारी २३, २०२३
आसगावात झडकला पारेषणचा वार्ताफलक
मंगळवार, सप्टेंबर ०६, २०२२
Breaking Crime News | भंडारा येथील प्राध्यापकास चंद्रपूर पोलिसांनी केली अटक; रात्री मुक्काम करून महिलांना लुटायचा !
भंडारा | (bhandara) येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या सोहन वासनिक यास चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. सुमित बोरकर असे बनावट नाव धारण करून तो फेसबुक च्या माध्यमातून ओळख निर्माण करून लुटत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. कोठारी येथील वार्ड क्र. ४ येथील रहिवासी रेणू शंभरकर यांच्या घरी २५ तोडे सोने त्यानेच चोरल्याचे उघड झाले आहे.
ता. ३१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या ५.३० चे दरम्यान कोठारी गावात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली. सदर सोहन वासनिक हा चोरी करणारा व्यक्ती हा फिर्यादी महिलेच्या घरी मुक्कामी आला होता. महिला सकाळी फिरायाला गेल्यावर त्याने चोरी करून पोबारा केला. भ्रमणध्वनीवरील फेसबुकच्या माध्यमातून ओळखी व त्याचे रूपांतर मैत्रीत करुन एकाकी असलेल्या स्त्रीयांना गाठून त्यांचा विश्वास संपादन करतो. त्यांच्या आर्थिक सुबकतेची परीपूर्ण माहिती काढून त्याच्याच घरात मुक्काम ठोकून चोरी करुन पसार होण्याचा त्याचा हातखंडा आहे.
Chandrapur Maharashtra India MH34 crime News
फेसबुक मैत्रीणीना लुटणाऱ्या भंडारा येथील प्राध्यापकास चंद्रपूर पोलिसांनी केली अटक
जिल्हयात पो स्टे कोठारी हद्दीतील एका ६७ वर्षीय विधवा महिलेशी फेसबुकचे माध्यमातुन फेक आयडी वरुन ओळख बनबुन तीचे बरोबर मैत्री करून विश्वास संपादन करून तीचे राहते घरी मुक्काम करून सकाळी सदर महिला मॉर्निंग वाकला गेल्या नंतर तिचे घरातून २४ तोळे सोन्याचे दागीने चोरी करून तो एक इसम पसार झाला . सदर बाबत कोठारी पोलीस स्टेशनला अप क्र 138 / 22 कलम 380 भा.द.वी. दाखल करण्यात आला सदर गुन्हयाचे गांभिर्य पाहून मा . पोलीस अधिक्षक अरवींद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर गुन्हा उघड करन्याचे आदेशीत केले . त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे यांचे पथक गठीत केले पो . नि . बाळासाहेब खाडे यांनी तांत्रीक तपास करून सदर आरोपीता बाबत त्याचे ठावठिकाण्याची माहिती प्राप्त केली . त्यानुसार सदर पथकाला भंडारा येथे रवाना करण्यात आले . सदर पथकाने तांत्रीक मदत घेवून सदर आरोपीला भंडारा येथून ताब्यात घेतले . सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याची सुमित बोरकर या फेक नावाने आयडी बनविली आहे व सदर आयडी मार्फत तो महिलांना जिवनसाथी मॅट्रोमणी व फेसबुकवर संम्पर्क करून मैत्री करतो . त्यांना त्याची पत्नी मयत झालेली असून त्याला एक लहान मुलगी असल्याचे सांगतो सदर लहान मुलीचा फोटो हा देखील दुसऱ्या मुलीचा ठेवलेला आहे . तसेच तो महिलांना एम.बी.बी.एस. एम . डी . स्त्रीरोग तज्ञ असल्याचे सांगून तसे त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , अकोला या नावाने आयडी कार्ड व त्यावर दुसऱ्या इसमाचा फोटो लावलेला आहे . तसेच सुमिन बोरकर , वैद्यकीय अधिकारी , अकोला या नावाची १,४४,००० / -रु.ची पे स्लीप बनवून महिलांना पाठवितो व लग्न करावयाचे असे सांगून विश्वास संपादन करून मैत्री करतो व त्यांचे घरी जावून काही अडचणी सांगून पैसे व दागीन्यांची मागणी करतो . नाही दिल्यास चोरी करतो सदर आरोपीताचे खरे नाव सोहम वासनीक रा . भागडी ता लाखांदूर जि.भंडारा असे आहे . व तो एका कॉलेजवर प्राध्यापक आहे . सदर आरोपीकडून गुन्हयातील व अतिरीक्त असे अंदाजे २ ९ ० ग्रॅम सोन्याचे दागीनेव दोन मोबाईल असा एकुन १२,०३,००० / - चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे . त्याने फसवणूक केलेल्या यवतमाळ , नागपूर , भंडारा येथील महिलांना सम्पर्क साधून माहिती दिली आहे . पुढे आवाहन करण्यात येते की , आणखी कोणी महिलांना सदर आरोपीने अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशनला तसेच या कार्यालयाला सम्पर्क साधावा . सदरची यशस्वी कामगीरी मा . श्री अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे , नापोशि नितेश महात्मे , जमिर पठाण , अनुप डांगे , नितेश महात्मे पोशि प्रसाद धुलगंडे , मयुर येरणे , प्रमोद कोटनाके यांनी केली .
Professor | Bhandara | arrested | Chandrapur police | Women | Gold | India | Maharashstra | Local Police | Crime | FIR | Vidarbha
सोमवार, ऑगस्ट २२, २०२२
Maharashtra Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत
हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेबठाकरे समृद्धी महामार्ग Maharashtra Samruddhi Mahamarg हा नागपूर ते भंडारा, गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोलीपर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. eknath Shinde | extend-nagpur-to-gadchiroli-bhandara-gondia
समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. तसेच नागपूर आणि गडचिरोली देखील समृद्धी महामार्गाने जोडले जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली ते मुंबई अंतर खूप कमी वेळात कापता येणार आहे. तसेच गोंदियावरून देखील मुंबईला लवकर पोहोचता येईल. त्यासाठी या मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
नागपूर- मुंबईतील अंतर कमी होण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. यासाठी नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे 60 टक्क्यापेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
नागपूर ते मुंबईमध्ये ७०० किलोमीटर अंतर असून १५० किमी वेगाने हे अंतर पार करता येणार आहे. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. आता हाच महामार्ग भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील या रस्त्यांचा फायदा होणार आहे.
The Mumbai–Nagpur Expressway or Nagpur–Mumbai Super Communication Expressway (officially known as Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi ...
बुधवार, ऑगस्ट १७, २०२२
Bhandara Rape Case | महिलेवर लैंगिक अत्याचार; Jatpura Gateसमोर निषेध आंदोलन
भंडारा- जिल्ह्यातील 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार (Bhandara Rape Case) करणा - या सर्व नराधमांना अटक करून सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना जिल्हा संघटक उज्वलाताई प्रमोद नलगे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. चंद्रपूर Chandrapur Jatpura Gateसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
gang-raping the 35-year-old woman in Bhandara
भंडारा Bhandara जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्याचार झालेल्या महिलेवर अत्याचार करणारा पहिला आरोपी अजुनही फरार आहे . अत्याचारानंतर महिला लाखनी पोलिस स्टेशन मधून रात्रीच्या वेळी आश्चर्यकारक पद्धतीने निघून जाते तिच्यावर पुन्हा आणखी दोन्ही व्यक्तीकडून जंगलात नेऊन अत्याचार होतो. या पीडित महिलेला मुरमाळी गावाच्या महिला पोलीस पाटील यांनी मदत करूनही करूनही व पीडितेच्या बहिणीचा जवाब पोलिसांनी घेतलेला नाही . ज्या वाहनातून सदर महिलेला आणण्यात आले त्या चालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांची जबाब नोंदविण्यात आलेले नाही पोलीस वाहनाचे लॉग बुकही ताब्यात घेतलेले नाही या प्रकरणी अत्याचारग्रस्त महिलेला कोणत्याही प्रकारचे सहानुभूती अथवा मदत न करणाऱ्या लाखनी पोलिस स्टेशनचे अधिकारी निलंबित केले आहे परंतू पहिला आरोपी अजुनही का पकडला गेला नाही याबाबतीत एस आय टी गठीत केल्याचे कळते परंतु त्याची अंमलबजावणी व पुढील तपास आणखी सखोल होण्याकरिता याबाबत काही मागण्या त्यांनी केल्या.
1 ) पिडीत महिलेला शासनाकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजे
2 ) SOP Standard Operating Producer ची अंमलबजावणी सदरील घटनेत झाली आहे का याची माहिती घेणे आवश्यक आहे . अशा केसेसमध्ये शासनाने SOP तयार केलेल्या आहेत का त्याची अंमलबजावणी झाली आहे का याची विचारणा करून जाब विचारला जावा
( 3 ) SIT स्थापन करण्यात आली आहे त्याचे संदर्भ आणि उद्दिष्टेबाबत विचारणा करण्यात यावी .