भंडारा- जिल्ह्यातील 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार (Bhandara Rape Case) करणा - या सर्व नराधमांना अटक करून सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना जिल्हा संघटक उज्वलाताई प्रमोद नलगे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. चंद्रपूर Chandrapur Jatpura Gateसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
gang-raping the 35-year-old woman in Bhandara
भंडारा Bhandara जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्याचार झालेल्या महिलेवर अत्याचार करणारा पहिला आरोपी अजुनही फरार आहे . अत्याचारानंतर महिला लाखनी पोलिस स्टेशन मधून रात्रीच्या वेळी आश्चर्यकारक पद्धतीने निघून जाते तिच्यावर पुन्हा आणखी दोन्ही व्यक्तीकडून जंगलात नेऊन अत्याचार होतो. या पीडित महिलेला मुरमाळी गावाच्या महिला पोलीस पाटील यांनी मदत करूनही करूनही व पीडितेच्या बहिणीचा जवाब पोलिसांनी घेतलेला नाही . ज्या वाहनातून सदर महिलेला आणण्यात आले त्या चालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांची जबाब नोंदविण्यात आलेले नाही पोलीस वाहनाचे लॉग बुकही ताब्यात घेतलेले नाही या प्रकरणी अत्याचारग्रस्त महिलेला कोणत्याही प्रकारचे सहानुभूती अथवा मदत न करणाऱ्या लाखनी पोलिस स्टेशनचे अधिकारी निलंबित केले आहे परंतू पहिला आरोपी अजुनही का पकडला गेला नाही याबाबतीत एस आय टी गठीत केल्याचे कळते परंतु त्याची अंमलबजावणी व पुढील तपास आणखी सखोल होण्याकरिता याबाबत काही मागण्या त्यांनी केल्या.
1 ) पिडीत महिलेला शासनाकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजे
2 ) SOP Standard Operating Producer ची अंमलबजावणी सदरील घटनेत झाली आहे का याची माहिती घेणे आवश्यक आहे . अशा केसेसमध्ये शासनाने SOP तयार केलेल्या आहेत का त्याची अंमलबजावणी झाली आहे का याची विचारणा करून जाब विचारला जावा
( 3 ) SIT स्थापन करण्यात आली आहे त्याचे संदर्भ आणि उद्दिष्टेबाबत विचारणा करण्यात यावी .