ठीक ११ वाजता अधिकारी कर्मचारी यांनी गायले राष्ट्रगीत
Chandrapur Newsचंद्रपूर १७ ऑगस्ट - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रम आज ठीक ११ वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिका राणी हिराई सभागृहात घेण्यात आला. CCMC Chandrapur
अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई त्यांचा प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी समूह राष्ट्रगीत गायन केले. मनपाचे तीनही झोन कार्यालये, सात शहरे प्राथमिक आरोग्य केंद्रे व इतर संलग्न कार्यालयातही ११ वाजता राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करण्यात आले होते. राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम शासनाद्वारे निर्देशीत करण्यात आला होता. त्या अनुषंगाने १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व इतर सर्व महत्वाच्या ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन होईल. सामान्य नागरिकांपासून सगळ्यांनी जे जिथे उभे असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते.