Ghugghus Local News |
घुग्गुस Ghugghus येथील राजीव रतन रेल्वे उड्डाणपुलाची व येथील वाहतूक कोंडी समस्या,जड वाहतूक विषयी वेकोली,रेल्वे अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी केली.यावेळी घुग्गुस व परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून सुचविलेले विविध पर्याय मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होणार आहे. Railway Officers along with Sub-Divisional Officers.
चंद्रपुर Chandrapur तालुक्यातील घुग्घुस येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे.घुग्घुस शहरातून जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून हा मार्ग थेट मुंबई ला जोडणारा आहे.येथे रेल्वे गेट असल्याने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. येथून दररोज रेल्वेच्या कोळशाची वॅगन जात असून हा गेट दिवसातून 20 ते 25 वेळा दररोज जवळपास 1 तास साठी बंद करण्यात येतो.
दरम्यान येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून अनेकदा अपघात सुद्धा घडत असतात.अशातच राजीव रतन चौकात उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे.त्यामुळं बायपास मार्गाचा विचार सुद्धा करण्यात आला.तसेच उसगाव येथील जड वाहतूक बंद करणे,पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे सोबतच आज बुधवारी अधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष पाहणी केली व आढावा घेतला.तसेच नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार निलेश गौड,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वेकोलीचे अधिकारी, रेल्वे अधिकारी, एसीसी,लोयड्स मेटल्स यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
breaking news | breaking news headlines | news live | google news | local news | azadi ka amrut mahotsav
chandrapur news | chandrapur india |
news 34 chandrapur | chandrapur breaking news today |
chandrapur pin code | chandrapur temperature |
chandrapur weather | chandrapur news |
chandrapur district |chandrapur map |
chandrapur to pune train | is pc chandra open today |
chandrapur express news | chandrapur district news |
news of chandrapur chandrapur
sainik school chandrapur