भद्रावती (Chandrapur News) तालुक्यातील मौजा पानवडाळा, टाकळी - बेलोरा , जेना , कढोली- किलोनी , कान्सा ( सि . ) , डोंगरगाव ( ख ) ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या शेत जमिनीचे अरबिन्डो इंफ्रास्ट्रक्चर रियालिटी प्रा . लिमी . Aurobindo Realty & Infrastructure Pvt. Ltd. या कंपनीतर्फे जमिन अधिग्रहनाची विशेषता जमिनीचे दर व कंपनीकडून संबंधीत ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या रोजगाराविषयी कोणताही संवाद साधण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा कंपीनला विरोध केला आहे
सर्व ग्रामपंचायतच्या मार्फत कंपनीकडे व मा . जिल्हाधिकारी साहेब , चंद्रपूर यांच्याकडे अनेकदा अरबिन्डो इंफ्रास्ट्रक्चर रियालिटी प्रा . लिमी . या कंपनीकडून होत असलेल्या जमिन अधिग्रहनाची विशेषता जमिनीचे दर व कंपनीकडून संबंधीत ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या रोजगारा विषयी व प्रकल्पबाधीत गावांना कोणत्या सुविधा देण्यात येणार याबाबत भुमीका स्पस्ट करण्याकरीता पत्र व्यवहार केले आहे.
मौजा बेलोरा गावाचे पुनर्वसन बाबत भुमीका स्पस्ट करण्या संदर्भात संबंधीत ग्रामवाशीयांकडून अनेकदा निवेदन देवून सुद्धा कंपीन कडून व मा . जिल्हाधिकारी साहेब , चंद्रपूर यांचेकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. प्रकल्पग्रस्तांनी व ग्रामपंचायतीनी केलेल्या पत्र व्यवहाराची सुद्धा दखल घेवून उत्तर देण्यात आलेले नाही . त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झालेली आहे.
त्याचप्रमाणे दिनांक २१/०६/२०२२ ला झालेल्या पर्यावरणीय जनसुनावनीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर कंपनीकडून देण्यात आले नाही . व कंपनीने कोणताही अहवाल आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीला देण्यात आलेला नाही . त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या जनसुनावणीचा व कंपनीचा कडाडून विरोध केला आहे . आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी आपणास विनंती करतो की , जोपर्यंत कंपनी गावकऱ्यांशी चर्चा करून गावक - यांच्या समस्यांचे निवारण करत नाही तोपर्यंत आपण कंपनीला पुढील कोणत्याही प्रकारचे काम करण्याची परवाणगी देण्यात येवू नये, अशी मागणी केली आहे .
https://www.khabarbat.in/
Aurobindo Realty & Infrastructure Pvt. Ltd
(Chandrapur News34 MH 34) Mauja Panwadala, Takli-Belora, Jena, Kadholi-Kiloni, Kansa (Si), Dongargaon in Bhadravati Taluka चंद्रपूर वार्ता