Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १७, २०२२

Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटपाचा कार्यक्रम



Chandrapur News | दिनांक 16 ऑगस्ट स्थानिक जटपुरा गेट Jatpura Gateयेथे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा श्री. अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.  (Chief Minister of Delhi Shri. Arvind Kejriwal's birthday )

या कार्यक्रमांमध्ये अरविंद भाई केजरीवाल यांचे आयुष्य वाढो आणि देश भ्रष्टाचार मुक्त आणि सामान्य माणसाला शिक्षण आरोग्य पाणी वीज यासारख्या मूलभूत गरजा मिळण्याकरिता आम आदमीचे सरकार देशांमध्ये येण्याची काळाची गरज आहे. आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे केक कापून तसेच मिठाईचे वाटप करून हा आनंद साजरा करन्यात आला. Aam Aadmi Party's 

तसेच यावेळी  राष्ट्रनिर्माणसाठी आम आदमी पार्टी सोबत जूडा असे आवाहन करन्यात आले. जनतेची व आप कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिति मोठ्या संख्येने होती.  ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला अध्यक्षा ॲड.सुनिताताई पाटील होते व त्यांचा हातानी केक कापून केजरीवाल यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, भिवराज सोनी , मयूर राइकवार, संतोष दोरखंडे, सिकंदर सागोरे, सुनील सदभैय्या,अब्दुल रहेमान, राजेश चेडगुलवार,  मनोहर पाटिल, जास्मिन शेख, आरती आगलावे, सुजाता बोदेले, योगेश आपटे, रुपा काटकर, वंदना कुंदावार, गजरा बाई जाधव, ममता गनवीर,  सुहानी दुर्योधन, सुहास रामटेके, मंगला मुक्के, कल्पना सागोरे, अनिता गम्पलवार, शर्मा मैडम, किशोर पुसलवार, सुनील भोयर, परमजीत सिंह झगड़े, बबन कृष्णपलीवार, सुमित हस्तक, सोनल पाटिल, राजू कूड़े, सन्तोष बोपचे, शंकर धुमाळे, विनोद रेब्बेवार,   इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.