Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०६, २०२२

Breaking Crime News | भंडारा येथील प्राध्यापकास चंद्रपूर पोलिसांनी केली अटक; रात्री मुक्काम करून महिलांना लुटायचा !



भंडारा | (bhandara) येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या सोहन वासनिक यास चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. सुमित बोरकर असे बनावट नाव धारण करून तो फेसबुक च्या माध्यमातून ओळख निर्माण करून लुटत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. कोठारी येथील वार्ड क्र. ४ येथील रहिवासी रेणू शंभरकर यांच्या घरी २५ तोडे सोने त्यानेच चोरल्याचे उघड झाले आहे. 


ता. ३१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या ५.३० चे दरम्यान कोठारी गावात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली. सदर  सोहन वासनिक हा चोरी करणारा व्यक्ती हा फिर्यादी महिलेच्या घरी मुक्कामी आला होता. महिला सकाळी फिरायाला गेल्यावर त्याने चोरी करून पोबारा केला. भ्रमणध्वनीवरील फेसबुकच्या माध्यमातून ओळखी व त्याचे रूपांतर मैत्रीत करुन एकाकी असलेल्या स्त्रीयांना गाठून त्यांचा विश्वास संपादन करतो. त्यांच्या आर्थिक सुबकतेची परीपूर्ण माहिती काढून त्याच्याच घरात मुक्काम ठोकून चोरी करुन पसार होण्याचा त्याचा हातखंडा आहे. 

Chandrapur Maharashtra India MH34 crime News 


फेसबुक मैत्रीणीना लुटणाऱ्या भंडारा येथील प्राध्यापकास चंद्रपूर पोलिसांनी केली अटक  

 जिल्हयात पो स्टे कोठारी हद्दीतील एका ६७ वर्षीय विधवा महिलेशी फेसबुकचे माध्यमातुन फेक आयडी वरुन ओळख बनबुन तीचे बरोबर मैत्री करून विश्वास संपादन करून तीचे राहते घरी मुक्काम करून सकाळी सदर महिला मॉर्निंग वाकला गेल्या नंतर तिचे घरातून २४ तोळे सोन्याचे दागीने चोरी करून तो एक इसम पसार झाला . सदर बाबत कोठारी पोलीस स्टेशनला अप क्र 138 / 22 कलम 380 भा.द.वी. दाखल करण्यात आला सदर गुन्हयाचे गांभिर्य पाहून मा . पोलीस अधिक्षक अरवींद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर गुन्हा उघड करन्याचे आदेशीत केले . त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे यांचे पथक गठीत केले पो . नि . बाळासाहेब खाडे यांनी तांत्रीक तपास करून सदर आरोपीता बाबत त्याचे ठावठिकाण्याची माहिती प्राप्त केली . त्यानुसार सदर पथकाला भंडारा येथे रवाना करण्यात आले . सदर पथकाने तांत्रीक मदत घेवून सदर आरोपीला भंडारा येथून ताब्यात घेतले . सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याची सुमित बोरकर या फेक नावाने आयडी बनविली आहे व सदर आयडी मार्फत तो महिलांना जिवनसाथी मॅट्रोमणी व फेसबुकवर संम्पर्क करून मैत्री करतो . त्यांना त्याची पत्नी मयत झालेली असून त्याला एक लहान मुलगी असल्याचे सांगतो सदर लहान मुलीचा फोटो हा देखील दुसऱ्या मुलीचा ठेवलेला आहे . तसेच तो महिलांना एम.बी.बी.एस. एम . डी . स्त्रीरोग तज्ञ असल्याचे सांगून तसे त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , अकोला या नावाने आयडी कार्ड व त्यावर दुसऱ्या इसमाचा फोटो लावलेला आहे . तसेच सुमिन बोरकर , वैद्यकीय अधिकारी , अकोला या नावाची १,४४,००० / -रु.ची पे स्लीप बनवून महिलांना पाठवितो व लग्न करावयाचे असे सांगून विश्वास संपादन करून मैत्री करतो व त्यांचे घरी जावून काही अडचणी सांगून पैसे व दागीन्यांची मागणी करतो . नाही दिल्यास चोरी करतो सदर आरोपीताचे खरे नाव सोहम वासनीक रा . भागडी ता लाखांदूर जि.भंडारा असे आहे . व तो एका कॉलेजवर प्राध्यापक आहे . सदर आरोपीकडून गुन्हयातील व अतिरीक्त असे अंदाजे २ ९ ० ग्रॅम सोन्याचे दागीनेव दोन मोबाईल असा एकुन १२,०३,००० / - चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे . त्याने फसवणूक केलेल्या यवतमाळ , नागपूर , भंडारा येथील महिलांना सम्पर्क साधून माहिती दिली आहे . पुढे आवाहन करण्यात येते की , आणखी कोणी महिलांना सदर आरोपीने अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशनला तसेच या कार्यालयाला सम्पर्क साधावा . सदरची यशस्वी कामगीरी मा . श्री अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे , नापोशि नितेश महात्मे , जमिर पठाण , अनुप डांगे , नितेश महात्मे पोशि प्रसाद धुलगंडे , मयुर येरणे , प्रमोद कोटनाके यांनी केली .


Professor | Bhandara | arrested | Chandrapur police |  Women | Gold | India | Maharashstra | Local Police | Crime | FIR | Vidarbha


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.