Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ०६, २०२३

ब्रम्हपुरी काँग्रेसमध्ये गटबाजी चव्हाट्यावर, आमदार वडेट्टीवार यांचे मौन

ब्रम्हपुरी काँग्रेसमध्ये गटबाजी चव्हाट्यावर, आमदार वडेट्टीवार यांचे मौन


काँग्रेस गोटात अंतर्गत कलहाने वातावरण तापले

विनोद चौधरी 
 प्रतिनिधी ब्रम्हपुरी :
नुकतीच ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने काँग्रेस गोटात वातावरण तापले असून गटबाजी असल्याचे उघड झाले आहे. मात्र या सर्व प्रकारावर आमदार विजय वडेट्टीवार यांनी मौन साधले आहे. ब्रम्हपुरी राजकीय वर्तुळात आमदार वडेट्टीवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

बाजार समिती निवडणुकीच्या मतदान दिनी किसान सेलचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा तालुकाध्यक्ष तिडके यांच्यावर मनमानी पणाचा आरोप करत  दिला. बाजार समितीचे निकाल लागताच तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी  नानाजी तुपट हे काँग्रेस पक्षात आल्यानंतर त्यांना तालुका किसान सेलचे तालुका अध्यक्ष पद दिले मात्र त्यांनी पक्ष बांधणी करिता कोणतेच मोठे काम केले नाही. उलट बाजार समिती निवडणुकीत विरोधी गटासोबत मिळून पक्षातील उमेदवाराविरोधात प्रचार केले असा ठपका ठेवून तुपट यांचा राजीनामा मंजूर केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून  सांगितले. तर नानाजी तुपट यांनी पत्रकार परिषदेतून खेमराज तिडके यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनाच पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली.व वडेट्टीवार यांच्या सांगण्यावरून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. वडसा येथे झालेल्या  कार्यक्रमात तालुकाध्यक्ष तिडके यांनी मीच तुझी तिकीट कापली, पक्षात मी म्हणेन तसा होते, तुझा पद मी 30 तारखेला काढून घेतो. असे म्हटल्यानंतर आमच्यात वादावादी झाली व जातीला शिवीगाळ केल्यामुळे मी किसान सेल तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असे नानाजी तुपट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवडणुकीच्या चार दिवसा अगोदर तिडके यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ग्रामपंचायत गटातील उमेदवार उमेश धोटे यांच्या विरोधात  मतदारांना आर्थिक प्रलोभन देऊन  शिकवणी  पत्रिकेसमोरील अंगठी चिन्हासमोर (×) चिन्ह टाकून वडेट्टीवार यांचे आदेश असल्याचे सांगून उमेश धोटे यांना पाडण्याकरिता खुलेआम विरोधात प्रचार केला.माजी जि.प. सदस्य  प्रमोद चिमूरकर यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला  सर्व गोष्टी पासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना सभेला बोलविण्यात येत नव्हते. हि निवडणूक पक्षाची नव्हती का? मग अश्या नेत्यांना सभेला न बोलविणे हा खेमराज तिडके यांचा पक्ष विरोधी काम नाही का ?  असा आरोप तिडके यांच्यावर  करत तिडके यांचे  तालुकाध्यक्ष पद काढण्याची मागणी तुपट यांनी केली आहे.तर बाजार समिती निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य थाणेश्वर कायरकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला. कायरकर यांनी पराभवाचे खापर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्यावर  फोडले आहे . व कायरकर यांनी चिमूरकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्यावर ग्रामपंचायत गटाची जबाबदारी सोपवलेली होती, त्यांनी यशस्वीरित्या पार पाडत ग्रामपंचायत गटातून चारही उमेदवार निवडून आणले. तसेच सहकार गटाचे उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी खेमराज तिडके यांचे कडे होती यात कायरकर यांचा पराभव झाला . असे नानाजी तूपट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
काँग्रेस वर्तुळात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे पक्षात अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे उघड झाले आहे. नानाजी तुपट, सुचित्रा ठाकरे, सुरेश दर्वे यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता मात्र  पक्षाने यांना उमेदवारी नाकारल्याने निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. निवडणुकीदरम्यान  आरोप प्रत्यारोपामुळे जाणीवपूर्वक कुणबी गटाला लक्ष केले  जात आहे की काय? असे ब्रम्हपुरी काँग्रेस वर्तुळात दिसून येत आहे. काँग्रेस गोटात असलेल्या या अंतर्गत कलहावर राज्याचे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी मौन साधले असल्याने यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागून आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.