Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ०६, २०२३

नानाजी तुपट यांचा राजीनामा जिल्हाध्यक्षाने केला नामंजूर

नानाजी तुपट यांचा राजीनामा जिल्हाध्यक्षाने केला नामंजूर



विनोद चौधरी
ब्रम्हपुरी: Chandrapur news किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांचा राजीनामा जिल्हा काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी नानाजी दुप्पट (nanaji tupat) यांचा राजीनामा नामंजूर केला असून किसान सेलच्या अध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरिता कायम ठेवले आहे.

किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदान दिनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्यावर मनमानीपणाचा खापर फोडत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. बाजार समितीचा निकाल लागताच तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी नानाजी तुपट हे पक्षात आल्यानंतर पक्ष संघटने करिता सक्रिय कार्य केले नसल्याने व बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षाचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत राजीनामा मंजूर करून पक्षश्रेष्ठी कडे पाठविला होता व. लवकरच नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचे तिडके यांनी प्रसिद्धी पत्रातून कळविले होते. यानंतर यांनी पत्रकार परिषद घेऊन तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्या तक्रारीचा पाढा वाचत तालुकाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी केली होती. तिडके व तुपट यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे काँग्रेस गोटात वर्चस्वावरून कलह दिसून आला .
या प्रकाराकडे आमदार यांनी चुप्पी साधली होती. जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी नानाजी तुपट यांचा राजीनामा नामंजूर करून पक्षाच्या बळकटी करिता व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता किसान सेलचे अध्यक्ष पद कायम ठेवत नियुक्ती पत्र नानाजी तुपट यांना दिले आहे. वरिष्ठांच्या आदेशाने काँग्रेस पक्षात नानाजी तुपट यांचे हात पुन्हा बळकट झाले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.