Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०५, २०२३

सचिनने शेअर केला चुलीचा फोटो; म्हणाला अर्जुनची खूप आठवण येतेय! | Sachin Tendulkar Tadoba @sachin_rt

सचिनने शेअर केला ताडोबातील चुलीचा फोटो; म्हणाला अर्जुनची खूप आठवण येतेय! |  Sachin Tendulkar Tadoba
Twitter post @sachin_rt

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या ताडोबाच्या भ्रमंतीवर आहे. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त (Buddha Purnima 2023) तो प्राण्यांचे दर्शन देखील घेणार आहे. त्यासाठी तो चार मे रोजीच ताडोबाच्या जंगलात दाखल झाला. 

मैदानात शतकांचं शतक साजरं करणाऱ्या सचिननं आपल्या वयाचं अर्धशतक आपल्या खास मंडळींसोबत एका सुंदर निसर्गरम्य रिसॉर्टवर सेलिब्रेट केलं.  दरम्यान आज  दुपारी त्याने एक फोटो शेअर केलेला आहे. त्या फोटोमध्ये पत्नी अंजली, मुलगी सारा आणि सचिन तेंडुलकर दिसत आहेत. यावेळी सचिन तेंडुलकर ग्रामीण भागातील आदिवासी गावात एका चुलीसमोर बसून फुंकणीने चूल पेटवण्याचा प्रयत्न करीत आहे. हा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला असून, त्यासोबत त्याने एक मेसेज सुद्धा लिहिलेला आहे. (It's not every day that you hit a half-century, but when you do, it's worth celebrating with the ones who matter the most. Recently celebrated a special 50 in a quiet serene village with my team - my family! ) त्यामध्ये मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या आयपीएल मध्ये व्यस्त असल्याने त्याची खूप आठवण येते., असे देखील उल्लेखित केले आहे.  (PS: Missed Arjun a lot as he is busy with the IPL.)


सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभ प्रसंगी आपण सर्वांनी भगवान बुद्धांनी दाखवलेल्या करुणेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या प्रेम आणि दयाळूपणाच्या शिकवणुकी स्वीकारून आपल्या जीवन प्रवासात आपल्याला शांती आणि आनंद मिळू दे, असेही सचिनने म्हटले आहे. 


     भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फेब्रुवारी महिन्यातच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी करिता येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुन्हा दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीनंतर काल गुरुवारी पत्नी अंजली व काही मित्रांसोबत ताडोबात दाखल झाला आहे. काल सायंकाळी व आज शुक्रवारी कोलारा गेटमधून मध्ये सफारी केली. या भागात प्रस्थ असलेल्या छोटीतारा वाघिणीचे काल आणि आज दोनदा दर्शन झाले आहे. त्यानंतर दुपारी अलिझंझा गेटमधून सफारीला जाण्यापूर्वी अलिझंझा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेऊन सोळा पहिली ते चौथी मधील 16 विद्यार्थ्यांना सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या वतीने सचिनने स्वतःचे हस्ते साहित्यसह स्कूल बॅगचे वितरण केले. मागील सफारी मध्यें शाळेला भेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्याचा शब्द दिला होता. तो शब्दही आज तेंडुलकर यांनी पूर्ण केला. सायंकाळी सफारी वरुन बांबू रिसार्ट मध्ये मुक्कामी आल्यानंतर मुलगा अर्जुनची आठवण करीत ताडोबातून सोशल मीडियावर (इंस्टाग्राम, फेसबुक) एका खेडेगावातील चुलीवर स्वयंपाक करतानाचा फोटो आणि मेसेज सचिन तेंडुलकर यांनी शेअर केला आहे. क्रिकेटच्या मैदानात शतकावर शतके मारणाऱ्या सचिन आपल्या वयात वयाचं अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचे सेलिब्रेशन काही खास मित्रमंडळींसोबत एका सुंदर निसर्गरम्य रिसॉर्टवर सेलिब्रेट केले. जो फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे,त्यामध्ये पत्नी अंजली, मुलगी सारा आणि सचिन तेंडुलकर दिसत आहे. ग्रामीण भागातील एखाद्या गावातील स्वयंपाकाच्या चुलीसमोर बसून फुंकणीने चूल पेटविण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलगी सारा सुनील चुलीमध्ये काट्या लावत आहे. तर पत्नी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलगा अर्जुन सध्या आयपीएल मध्ये व्यस्त असल्याने त्याची खूप आठवण येते आहे असे देखील त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे. परत दोन दिवस ताडोबात सफारी करून रविवारी सचिन पत्नी अंजली व मित्रांसोबत परत जाणार आहे.

It's not every day that you hit a half-century, but when you do, it's worth celebrating with the ones who matter the most. Recently celebrated a special 50 in a quiet serene village with my team - my family!  PS: Missed Arjun a lot as he is busy with the IPL.

ऐसा नहीं है कि हर दिन आप अर्धशतक मारते हैं, लेकिन जब आप ऐसा करते हैं, तो यह उन लोगों के साथ जश्न मनाने के लायक होता है जो सबसे ज्यादा मायने रखते हैं। हाल ही में एक शांत शांत गांव में अपनी टीम - मेरे परिवार के साथ विशेष 50 मनाया! पुनश्च: अर्जुन को बहुत याद किया क्योंकि वह आईपीएल में व्यस्त है।

Wishing everyone a happy Buddha Purnima. On this auspicious occasion, let us all strive to follow the path of compassion that Lord Buddha showed us. May we find peace and happiness in our journey of life by embracing his teachings of love and kindness.


बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतरत्न सचिन तेंडुलकर ताडोबात दाखल 

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतरत्न सचिन तेंडुलकर ताडोबात दाखल
भारतरत्न सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) गुरुवारी नागपुरात पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होती. दरवर्षी तेंडुलकर आपल्या कुटुंबासह चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला (Tadoba Tiger Reserve) भेट देण्यासाठी येत असल्याची माहिती आहे.  बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर सचिन थेट ताडोबासाठी रवाना झाला.

 Master Baster Sachin Tendulkar and Anjali Tendulkar in #Nagpur. Both left Tadoba from Nagpur airport. #Tadoba #chandrapur 

Sachin Tendulkar in Nagpur, left for Tadoba with his wife 

क्रिकेटर सचिन तेंडुलकरला Sachin Tendulkar जंगल सफारीचं वेड आहे. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते व्याघ्र प्रकल्पात पोहोचतात. काही दिवसांपूर्वीच सचिनने उमरेड करंडला अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला होता. गुरुवारी सचिन पुन्हा एकदा पत्नी अंजली तेंडुलकरसोबत जंगल सफारीसाठी पोहोचला. त्याच्यासोबत त्याचे काही जवळचे मित्रही होते. सचिन आणि त्याचे कुटुंबीय नागपूरहून रस्त्याने ताडोबासाठी Sachin Tendulkar Tadoba निघाले. (Sachin Tendulkar along with his wife Anjali Tendulkar once again arrived for a jungle safari. He had some close friends with him)


सचिनच्या नागपूर विमानतळावर आगमनाची बातमी समजताच चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती. विमानतळावर सुरक्षा दलाच्या जवानांनीही सचिनचे जोरदार स्वागत केले.बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. जर सर्व काही ठीक झाले आणि हवामान स्वच्छ असेल तर सचिनला चांदण्या रात्रीही वन्य प्राणी दिसतील.


 Master Baster Sachin Tendulkar and Anjali Tendulkar in #Nagpur. Both left Tadoba from Nagpur airport.

#Tadoba #chandrapur 

Sachin Tendulkar - Wikipedia
Sachin Tendulkar - cricbuzz
Sachin Tendulkar centuries
Sachin Tendulkar history
Sachin Tendulkar career runs
Sachin Tendulkar Test runs
Sachin Tendulkar family
Sachin Tendulkar last match

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.