Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०५, २०२३

ठळक बातमीपत्र ५ मे | News Update 5 May



शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे 
Sharad Pawar takes back his resignation as the national president of NCP. "I'm taking my decision back," he announces in a press conference.
राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत आहे, अस शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपला निर्णय जाहीर केलेला आहे. पक्षामध्ये एक वेगळी उभारणी निर्माण झालेली आहे, म्हणून तो निर्णय मागे घेतलेला आहे. 


नागपूरमधील विकास कामांवर  आढावा बैठक
नागपूरमधील विकास कामांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर मध्ये आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत रेशीम भाग मैदानाचा विकास स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत, तीर्थक्षेत्रांचा विकास पश्चिम आणि उत्तर नागपूरतील रस्त्यांची काम पुनापूर भरतवाडा येथील वीटभट्टी प्रकल्प, नागपूर सुधार प्रण्यास, नवीन इमारत तसंच नाशिकच्या व्यावसायिक कॉम्प्लेक्स अशा अनेक प्रकल्पांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. 

हलबा समाजाच्या कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी मध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत यावेळी गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 


 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 10 महिन्यांत 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे. 

प्रेम, सत्य आणि अहिंसाची शिकवण
ज्ञान सहिष्णुता आणि सदाचाराचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांची जयंती आज देशात उत्साहात साजरी होत आहे राष्ट्रपती द्रोपदी Murnu यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात भगवान बुद्धांचा साधा आणि प्रभावी उपदेश आपल्याला प्रेम सत्य आणि अहिंसाची शिकवण देतो असे म्हटले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

भगवान बुद्धांचा आदर्श सर्वांना मार्ग दाखवत आणि सामर्थ्य देत राहो असं म्हटलं आहे.  तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव प्राणी मात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकाला बाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत 

उपराष्ट्रपती  लंडन भेटीवर
उपराष्ट्रपती जगदीश धनगर हे दोन दिवसांच्या लंडन भेटीवर पोहोचले आहेत आपल्या लंडन भेटीत त्याच किंग जॉर्ज तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत 

अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष 
भारतीय वंशाचे व पुणे शहरात जन्म झालेले अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ असलेले अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष झाले आहे. अजय बंगा यांचे महाराष्ट्राशी आणि पुण्याशी नाते आहे. त्याबद्दल आता पुणेकरांना अभिमान वाटणार आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाची शिफारस केली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.