Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०५, २०२३

शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे | Sharad Pawar Resigns


5 may
 राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत आहे अस शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपला निर्णय जाहीर केलेला आहे. पक्षामध्ये एक वेगळी उभारणी निर्माण झालेली आहे, म्हणून तो निर्णय मागे घेतलेला आहे. 

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आपण मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी आज जाहीर केलं देशभरातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य चाहते यांनी प्रेम आणि विश्वास व्यक्त करत एकमुखाने माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली लोक माझी सांगाती यावर आपला कायम भर राहिला आहे सामाजिक भावनेचा अनादर आपल्याकडून होऊ शकत नाही त्यामुळे आपण राजीनामेचा निर्णय मागे घेत असल्याचं तसेच राजीनामाची कल्पना सर्व सहकाऱ्यांना दिली नाही त्याबद्दल आपण त्यांची माफी मागत असल्याचं पवार यांनी सांगितलं

4 may
शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार या बाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाला पसंती दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांच्या नावाला पक्षातील विरिष्ठ नेत्यांनी पसंती दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे याच आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होण्याची शक्यता आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी चार नावांची चर्चा आहे. सहा तारखेची पाच तारखेला बैठक घ्या, असं पवारांनी म्हटलं. समिती जो काही निर्णय घेणार तो आपल्याला मान्य असेल, असेही शरद पवारांनी म्हटल आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच नाराजी दिसून येत आहे. कुठल्याही नेत्याला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे ही नाराजी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे काही नेते नाराज झाले आहेत. पवारांनी अचानकपणे निर्णय जाहीर केला.  अनेक नेत्यांना त्याविषयी कोणतीही कल्पना नव्हती उघडपणे त्यांनी सांगितले . आज मात्र राष्ट्रवादीमध्ये काही नेत्यांनी याविषयी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली. यांचा अंतर्गत मुद्दा नाहीये कारण की राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीने अचानक राजीनामा देतात आणि त्या संदर्भातली कल्पना इतर कुठल्याही नेत्याला नसते, यावरूनच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. कारण की हा फक्त पवार कुटुंबीयांचा प्रश्न नाहीतर राष्ट्रवादी पक्षाचा प्रश्न आहे, अशा परिस्थितीमध्ये जर राजीनामाचा निर्णय आधीच ठरला होता. 

ज्या पद्धतीने अजित पवार यांनी काल स्वतः सांगितलं होतं की एक मे रोजी राजीनामा होणार होते. पण त्यानंतर २ मे रोजी राजीनामा घोषित करण्यात आला.  म्हणजे या संदर्भातला राजीनामाचा निर्णय कुटुंबियांत झाला होता आणि या पवार कुटुंबीयांमधला हा राजीनामाचा निर्णय अनेक नेत्यांना पचनी पडलेला दिसत नाही.  अशा पद्धतीने पवार कुटुंबीयांच्या अंतर्गत बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या राजीनामाच्या निर्णया होतो, यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि ती नाराजी काही नेते खाजगीत व्यक्त करताना दिसतात. 

नेत्यांना साध्य करताना विश्वासात घेतलं पाहिजे होतं मला, असं जाणवतंय असं देखील पवार म्हणाले. विचारून निर्णय घेतला असता तर विरोध झाला असता असा पवारांनी म्हटलं तरी आपल्या निर्णयाचे या ठिकाणी समर्थन केले आहे आणि कार्यकर्त्यांना मी विश्वासात घ्यायला हवं होतं पण विचारून निर्णय घेतला असता तर त्याला विरोध झाला असता असं पवार म्हणाले. 

भाकरी फिरवण्याचा वक्तव्य केलं होतं.  मी युवकांची मत विचारात घेणारा नेता आहे. ग्रामीण भागातील युवक आणि मुख्य प्रवाहामध्ये आणायचा आहे, अस शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं मात्र तसं झालं असतं तर त्यांनी निर्णयाला विरोध केला असता असे शरद पवार यांनी म्हटलं. 

कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर लावलेले आहेत.  या बॅनरमध्ये अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ठाण्यातील कार्यकर्ते हातात बॅनर घेऊन उभे आहेत.  पवार साहेब निर्णय मागे घ्या असा या बॅनरवर ठाण्यामध्ये लिहिलेला आहे. आम्हाला शरद पवार यांचा नेतृत्व हवा आहे, अशी मागणी ठाण्याचे कार्यकर्ते करत आहेत. 

3 may
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोडू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.  कुडाळमध्ये पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमतांना मंजूर करण्यात आला.  चोपडा तालुक्यातील बुधगाव इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण साळुंखे यांनी रक्ताने पत्र लिहिले. बॅनर लावून शरद पवार यांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केलेली आहे, महाराष्ट्रात नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे, असें  या बॅनर वर लिहिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या उपस्थित वाय बी सेंटर येथे बैठक सुरू आहे. या बैठीकीसाठी शरद पवार पोहोचले आहेत. बैठकीला सुप्रिया सुळे,अजित पवार, प्रफुल पटेल, बाळासाहेब पाटील, हेमंत टकले व हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.

यशवंतराव चव्हाण सभागृहातील बैठकीचे जयंत पाटील यांना निमंत्रण नसल्याची माहिती समोर येत आहे. बैठक सुरू असताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून राजीनामा दिला आहे. ठाण्यातील जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि इतर पदाधिकऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांनी काही करून राजीनामा मागे घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार राजीनामा प्रकरण व आत्मचिरीत्रावर उद्धव ठाकरे लवकरच सामानामध्ये मुलाखत देणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार अशी घोषणा करताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तुम्ही ही घोषणा मागे होत नाही तोवर आम्ही सभागृह सोडणार नाही असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. Sharad Pawar Resigns


Sharad Pawar Resigns : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार म्हणाले.


"24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे," असं शरद पवार यांनी म्हणाले. तसंच "मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले.


कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या निर्णयाचा आदर करावा – अजित पवार


राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या निर्णयाचा आदर करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. तुम्ही थांबलात, तर आम्हीही थांबतो, ज्यांना हा पक्ष चालवायचाय त्यांना चालवू देत, आम्ही अपक्ष म्हणून लढू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आदि नावे चर्चेत आहेत.

अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष होणार का? यावर ते पत्रकारांना काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात.

शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता अजित पवार यांची भूमिका समोर आली आहे. शरद पवार यांनी जर राष्ट्रावादीचा अध्यक्ष बनवलं तर तुम्ही बनणार का असा असा अजित पवार यांना पत्रकाराने विचारला होता.यावर अजित पवार म्हणाले, नाही, मी नाही बनणार, मी त्याच्यात काम करू शकत नाही, असे ते म्हणाले. पुढे अजित पवार म्हणतात, प्रश्नच येत नाही, विचार करण्याचाही प्रश्न येत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या विधानानंतर त्याचा अध्यक्ष पदात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यासाठी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाया पडून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. 24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे,असं शरद पवार यांनी म्हणाले. तसंच मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे, असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले.

पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेने ठाकरे गट आणि काँग्रेसची चिंता वाढली आहे. (#SharadPawar #NCP #Maharashtra) महाविकास आघाडीतले कल्पतरु म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. शरद पवारांच्या आदेशाने महाविकास आघाडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पवारांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

#SharadPawar #NCP #Maharashtra

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.