Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २९, २०२३

आईने दिली हिंमत न हारण्याची शिकवण | Mother Death Anniversary



माझ्या आईचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात कवडापुर येथे दि 28/09/1956 रोजी झाला.भावंडामध्ये एक मोठा भाऊ व पाच बहिणीमध्ये थोरली असल्याने सर्व भावंडाचा सांभाळ करून 10 वी पर्यंत वायगाव ते चारगाव, सहा ते किमी पायी येणे जाणे असा प्रवास करून शिक्षण घेतले. सोबतच त्या काळचा प्रशिक्षण म्हणजे शिवणकला. याचे शिक्षण हिंगणघाट येथे नातेवाईकाकडे राहुन पूर्ण केले.

सन 1975 मध्ये नागरी येथील रहिवासी श्री. निळकंठ रामचंद्र डांगरे यांच्याशी झाला. सुधा नीलकंठराव डांगरे असे आईचे नाव. बाबा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे नोकरी करीत होते. जन्मापासून ते विवाहापर्यंत जिल्हातील ठिकाण न बघणारी आई शहरात न गोंधळता किरायाच्या घरात तुटपुंज्या पगारामध्ये आपला संसार केला. लहानपणापासुन काम करण्याची जिद्ध, सवय असल्याने सकाळी लवकर उठून नळाचे पाणी भरणे, सॉ मिल वरती जाऊन सरपण आणणे, रोज सकाळी पतीचा डब्बा वेळेवर देने, हा रोजचा नीत्यानियम. तुटपुंज्या पगारातील काही रक्कम गावी राहणाऱ्या म्हातारी सासुला मनीआर्डर करणे.

LATEST POSTS



सन 1976 मध्ये पहिल्या कन्येचा जन्म झाला. कु. संध्या निळकंठ डांगरे आणि मग दुसरा मुलगा मनोज निळकंठ डांगरे हा झाला.

दीड वर्षाची झाली तरीही संध्या बोलत नव्हती. मातेचे काळीज चिंतेने ग्रासले. तिने फॅमिली डॉक्टर डॉ. जोशी यांचेकडे आपली शंका सांगीतली. डॉक्टरने मुलगा बोलतो तर मुलगी पण बोलनार असे सांगुन धीर देत असत. परंतु नियतीचा डाव काळाच होता.

नंतर जन्मलेल्या दोन मुली अश्या एकुण तिन मुली मुक-बधीर जन्मास येऊनही ही माझी माऊली खचली नाही. त्याना मुकबधीर शाळेत प्राथमीक शिक्षण दिले. त्यानंतर माध्यमीक शिक्षण हायस्कुल येथे सामान्य मुलासारख दिले. नंतर त्यांना स्वयंरोजगाराचे धडे देण्याकरीता बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेत अंपगाची कार्यशाला 'संधीनिकेतन येथे प्रशिक्षीत करण्यात आले.

माझी माऊली लहान असुनही आपल्या थोरल्या भावाच शिक्षण, व विवाह सुद्धा केल. अश्या मदतीची, सहकार्याची भावना होती. मुलांची शिक्षण पुर्ण झाल्यानंतर यांचे सेवायोजन कार्ड काढल्यानंतर शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले व यांना यशही मिळाले.

पुढे लग्नाचे वय झाले. परंतु अपंग व्यक्तीना कोण आपल जिवनसाथी निवडणार? आईच काळीज, सतत चिंता आणि लोक विचारात असायचे, स्वतःचे काम् इच्छा,आवड यांना दुयम स्थान देत राहिली.

शेवटी आपल्या तिन्ही मुक-बधीर मुलीसाठी डॉक्टरच्या सल्याने अंपग नसलेल्या मुलासोबत लग्न करून दिले.
आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विवाहाची समस्या असताना या माऊलीनी पुढील पिढी अपंग होऊ नये म्हणून शरीराने सक्षम व्यक्ती सोबत विवाह करून दिले. आज मुलीच्या मुली मुक बधिर न होता बोलू लागल्या. त्यात मोठ यश प्राप्त झाले. अश्या या खडतर जिवनाचा प्रवास करणाऱ्या माऊलीस कॅन्सरसारखा आजार झाल. आणी एक वर्षाआधी आमचा आधारस्तंभ गेला. तिच्या जाण्यान मुली, मुलगा, पती, नातवंड यांचे कायमचे छत्र हरपले. आज त्यांचा प्रथम स्मृतीदिन. या निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.


- मनोज डांगरे
9404789654



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.