चंद्रपूर जिल्हा हा महाऔष्णिक विज निर्माण करणारा जिल्हा आहे. ही विज निर्माण करण्यासाठी ईथे होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाचा सामना चंद्रपूरकर गेल्या कित्येक वर्षांपासून सोसत आहेत. मोठ्या प्रमाणात जळणार्या कोळशामुळे वाढणारी उष्णता , नद्यांच प्रदुषण, मोठमोठाले ट्र्क , हायला , कॅप्सुल यामुळे वाढलेली वाहतूक आणि अपघात , रस्त्यांची होत असलेली दुरावस्था , श्वसनाचे होत असलेले आजार , स्पाॅन्डिलायसीस चा वाढलेला त्रास असे अनेक दुष्परिणाम चंद्रपूरकर गेल्या कित्येक वर्षांपासून भोगत आहेत.
परंतू आम्हाला याचा फायदा मात्र काहीच नाही. नेमका हाच विषय घेऊन किशोरभाऊ जोरगेवार हे निवडणूक रिंगणात उतरले. 200 युनिट घरगुती वापराची विज ही आम्हाला मोफत मिळायला हवि कारण तो आमचा अधिकार आहे हे सर्वप्रथम चंद्रपूर मधील आजवर झालेल्या आमदारांपैकी कोणीही न मांडलेला विषय जोरगेवार यांनी उचलून धरला.
निवडून आल्यापासून आजवर झालेल्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा रेटून धरला , प्रकर्षाने मांडला. आता मात्र यावर्षी थेट नागपूर येथील विधानभवनावर बाईक रॅलीचा धडक मोर्चा आयोजित करून 200 युनिट मोफत विज या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
येत्या 26 डिसेंबर ला या अधिकार रॅलीचं आयोजन होत असुन आपल्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी आता आमदार किशोरभाऊ जोरगेवार हे समस्त चंद्रपूरकरांसह विधानभवनावर धडकणार आहेत.
मंडळी आमदार जोरगेवार हे आपल्या परीने सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहेतच. पण आता आपलंही हे कर्तव्य आहे की आपण आपल्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी आता या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरुप द्यायलाच हवं. त्यासाठी येत्या 26 डिसेंबर ला आपण आपली बाईक घेऊन अवश्य या अधिकार रॅलीत सहभागी व्हा आणि भव्य जनआंदोलन करून विधानभवनावर धडक देत सरकारला 200 युनिट विज घरगुती वापराकरीता मोफत देण्यासाठी बाध्य करू.....
शाम हेडाऊ,
महेश नगर, चंद्रपूर.
9834301568