राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप पनकुले यांनी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या बैठकीत घेतला पक्ष संघटनेचा आढावा !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात रामनगर येथे संपन्न झाली,बैठकीस मुख्य पाहुणे म्हणून नवनियुक्त पक्ष निरीक्षक श्री.दिलिपभाऊ पनकुले होते, बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,यांच्यासह माजी आमदार श्री.दीनानाथ पडोळे,राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष श्री. जानबाजी म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष श्री.बजरंगसिंह परिहार,प्रदेश सरचिटणीस श्री.हिराचंद बोरकुटे,प्रदेश सरचिटणीस श्री. मुनाज शेख,महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.
LATEST POSTS
जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तालुका/शहर/विधानसभा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी,महीला तालुकाध्यक्ष, विविध विभागांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या पक्षबांधणीचा आढावा मांडला,आणि पक्षाफुटीनंतरही जिल्ह्यातील संपूर्ण पक्ष एकासंघपणे आद.शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.आगामी जिल्हा परिषद,पं.स./न.प. निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात अनेक बैठका झाल्या,परंतु निवडणुका लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्साह कमी झालेला दिसतो.
२०२४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने किमान दोन विधानसभेच्या जागांची मागणी केली पाहिजे अशी संपूर्ण जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही राजेंद्र वैद्य यांनी आपल्या भाषणात सांगितले.
महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी महीला संघटनेचा आढावा मांडला,चंद्रपूर जिल्ह्याकडे पक्षनेतृत्वाने सतत दुर्लक्ष केल्याची खंत सुद्धा त्यांनी मांडली.पक्षनिरीक्षक श्री.दिलीप पनकुले यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा जाणून घेतला,कार्यकर्त्यांच्या भावना,तालुका निहाय कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेतले.आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना आपले मनोदय व्यक्त करतांना दिले.
पक्ष प्रवेश
याप्रसंगी २००४ मध्ये चिमूर लोकसभा क्षेत्रातून लोकसभा निवडणूक लढलेले श्री.योगराज कुथे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
*बैठकीला ओबीसी जिल्हाध्यक्ष डी.के.आरीकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मेहमूद मुसा,सेवादल जिल्हाध्यक्ष माणिकराव लोणकर,VJNT चे जिल्हाध्यक्ष रवी नेचपेलवार,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुहास बहादे,सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद पिंपलशेंडे,श्री.अरुण निमजे,अमर राठोड,जयंत टेमुर्डे,राजेंद्र दीक्षित,प्रफुल महाजन,डॉ.रघुनाथ बोरकर, बादल उराडे,महादेव देवतळे,प्रा.किसन वासाडे,महेश जेंगठे,हिराजी पावडे,बबलू शेख, कुळमेथे,राजू मुरकुटे,संतोष देरकर,श्रीनिवास गोसकुला,रवी दिकोंडा,रखिब शेख,शरद जोगी,रफिक निजामी,प्रवीण कोल्हे,कैलाश राठोड,प्रकाश वडुरकर,राजेंद्र वरघने,अरुण वासलवार,पुरुषोत्तम वाघ,स्वप्नील कावळे,गजानन आडे,सौ.अर्चना चावरे,पूजा शेरकी,शुभांगी साठे,किरण साळवी,निता गेडाम,अनिता माऊलीकर,श्रीमती सुशीलाताई तेलमोरे,सरस्वती गावंडे,सौ.मल्लेश्र्वरी,सौ. बहादुरे,हरिनाथ यादव,मिट्ठावार,भास्कर कावळे,रमेश माखिजा,करण बहादुरे,मनोहर जाधव,योगेश निपूंजे,प्रदीप लांडगे,यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.बैठकीचे
संचालन डॉ.आनंद अडबाले,आणि आभार प्रदर्शन मेहमूद मुसा यांनी केले,*