Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २७, २०२३

यह आझादी झुटी है, देश कि जनता भुखी है। Enlightenment workshop in Chhatrapati Sambhaji Nagar

यह आझादी झुटी है, देश कि जनता भुखी है। __ अण्णाभाऊ साठे यांच्या विधानांवर छत्रपती संभाजी नगर मध्ये प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न




छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) बालाजी सिलमवार :-
समाज जीवनात कार्यरत फुले शाहू आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना, 'यह आझादी झुटी है, देश कि जनता भुखी है।' __ अण्णा भाऊ साठे यांच्या विधानावर 16 आगष्ट 2023 ला बामसेफ अंतर्गत फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलच्या वतीने जनसंपर्क कार्यालय द्वारा बी. बी. मेश्राम, साकेत नगर (पेठे नगर), छत्रपती संभाजी नगर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून फुले शाहू आंबेडकराईट चळवळीचे संघटनात्मक कार्य वृद्धींगत होऊ शकेल.


LATEST POSTS


 या कार्यशाळेचे उदघाटन करताना समाजचिंतक अरविंद कांबळे म्हणाले की, हजारो वर्षांपासून दारिद्रयात खितपत पडलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला समाजाची गरज नाही अशी भावना उच्च शिक्षितांमध्ये बळावत चालली आहे जे वंचित मूलनिवासी बहुजन समाजासाठी घातक आहे. टाटा, बिरला, अंबानी, अदानी सारख्या उद्योगपती कडे संपत्तीचे केंद्रीकरण होत असल्याने सामान्य जनतेवर उपाशीपोटी भुके राहण्याची वेळ आली आहे. देशात 67% पदवीधर बेरोजगार आहेत. करिता काळानुसार आपली पावले उचलली पाहिजेत. म्हणून प्रशिक्षीत समाज आणि नेतृत्वाची गरज आहे.
            मातंग परिवर्तन परिषदेचे महासचिव प्रमुख वक्ते ईश्वरलाल दणके म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचा चळवळीचा पूर्वार्ध कम्युनिस्टाकडे तर उत्तरार्धात तेआंबेडकरवादाकडे वळले होते म्हणून ते म्हणाले की, 'जग बदल घालूनी घाव, मज सांगून गेले भीमराव.' ही त्याची पावतीच इतिहास रुपाने उपलब्ध आहे. वास्तववादी विचार स्विकारताना सर्वंकष क्रांतीसाठी अटी आणि शर्ती पाळल्या पाहिजेत. हे करीत असताना समविचारी लोकांशी आपसात भांडत बसू नये. याची जाणीव ठेवून मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे.या कार्यशाळेची अध्यक्षता करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, अण्णा भाऊ साठे हे कामगार नेते होते तर या अनुषंगाने विचार करता वर्तमान राज्यकर्त्यांकडून कामगारांच्या हक्क अधिकारांच्या अनुषंगाने अस्तित्वातील 44 कायद्यांचे 4 कायद्यात समावेश, रुपांतर करण्यात आले तेव्हा कामगारांनी ब्र काढल्याचे, संघर्ष केल्याचे दिसून आले नाही तर मग अण्णा भाऊ च्या विचारांची धग कशी प्रज्वलित होईल. शिक्षित, उच्च शिक्षित बेरोजगार होऊ शकतो पण सुशिक्षित झाल्यावर सुद्धा बेरोजगार व्हावे लागत असेल तर ही शैक्षणिक शोकांतिकाच आहे. समविचारी लोकांशी आपसात भांडत बसू नये ही अपेक्षा रास्त वाटत असली तरी आपसात भांडणारे सारे समविचारीच असतात काय? हे तपासून पहाण्याची नितांत आवश्यकता आहे. कम्युनिस्ट चळवळीचा विचार करताना कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधकीय कम्युनिझम चा विचार केला पाहिजे. जेणेकरून भारतीय जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून देशातील संपत्तीचे विकेंद्रीकरण केले पाहिजे, असा सत्यशोधकीय विचार केला जाऊ शकेल. जनतेने बीपीएल कार्ड काढून दारिद्रय रेषेखाली आपले नांव दाखल करण्यासाठी धडपड करण्यापेक्षा यातून बाहेर पडण्यासाठी धडपड केली पाहिजे. जेणेकरून त्यांच्यावर भुके, कंगाल होऊन उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. परिणामी स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल. करिता समाजात विविध विषयांवर असणारे जनतेचे संभ्रम आणि गैरसमज दूर करण्यासाठीच फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल प्रयत्नशील असल्यामुळे प्रत्येक रविवारी, सुट्टी च्या दिवशी नवीन नवीन विषयांवर कार्यशाळेचे निरंतर पणे आयोजन करीत आहे. हक्क अधिकारांची मागणी करीत असताना कर्तव्याची जाणीव ठेवून पूर्तता केली पाहिजे. अशा विविध समस्यांची उकल करून उपस्थित झालेल्या सर्व मुद्यांवर समर्पक माहिती देण्याचा अध्यक्षांनी प्रयत्न केला.
         या कार्यशाळेला प्रा. इंजिनिअर अनंत कुमार खोब्रागडे, भीमराव चाबुकस्वार, सुधाकर दांडगे, सारिका ठवरे, सुदर्शन घुले, कैलास तिरपुडे, जे. डी. टाकणखार इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी विषयाच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले आहे. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली. साप्ताहिक कार्यशाळा वेगवेगळ्या विषयांवर निरंतर पणे राबविण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.