माहिती व तंत्रज्ञानाने कास धरली तेव्हापासून माध्यमात अनेक बदल झालीत. आज सर्वच माध्यमे डिजिटल झालीत. मात्र, दहा-बारा वर्षांपूर्वीचा काळ बघितला तर तेव्हा क्वचितच न्यूज पोर्टल (News portal) किंवा वेबसाईट हा प्रकार होता. ज्यावेळी लोकांना न्यूज पोर्टल म्हणजे काय हे माहित देखील नव्हते, अशा काळात चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदा एक न्यूजपोर्टल (publicpanchanama.com) सुरु झाले होते. पब्लिक पंचनामा असे त्याचे नाव. त्यावेळी वेबसाईट बनविण्याचा खर्च मोठा होता. तेव्हापासूनच आजही पब्लिक पंचनामा नावाचे पोर्टल माध्यम क्षेत्रात सेवा देत आहे.
सामाजिक कार्यकर्त्ते विजय सिद्धावार (Vijay Siddhwar) यांनी पब्लिक पंचनामा नामक साप्ताहिक सुरू केले. ते पेशाने शिक्षक आहेत आणि मुल शहरातील नवभारत कन्या विद्यालयात नोकरी करतात. शिवाय त्यांना डिजिटल माध्यमात आवड असून, ते पत्रकारितेमध्ये सक्रिय आहेत. विजय सिद्धावार हे मूळचे मुल शहरातील आहेत. त्यांनी शहरातीलच महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते लहानपणापासूनच सामाजिक कार्यात रुची असलेल्या व्यक्ती आहेत. त्यांनी विद्यार्थी जीवनातच अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी प्रबोधिनी नावाची एक संस्था देखील स्थापन केली होती. कालांतराने ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऍड. पारोमिता गोस्वामी (Paromita Goswami) यांच्यासोबत श्रमिक एल्गार या सामाजिक संघटनेत सक्रिय झाले.
विजय सिद्धावार हे नवभारत कन्या विद्यालयात (Navbharat kanya Vidyalay) शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी शाळेत अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांनी शाळेत मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. तसेच, त्यांनी मुलींना आत्मनिर्भर होण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. शिक्षक म्हणून, सिद्धावार विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी शिकवतात. ते त्यांना सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढण्याचे प्रोत्साहन देतात. ते सरकार आणि समाजावर जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
विजय सिद्धावार हे डिजिटल (Digital Media) माध्यमातही सक्रिय आहेत. त्यांनी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर लेखन केले आहे. चंद्रपूर - गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शोध पत्रकारिता पुरस्कार 2004 मध्ये त्यांना देण्यात आला. (Chandrapur Press Club) चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने डिजिटल माध्यमातून असलेला शोध पत्रकारिता पुरस्कार त्यांना 2022 मध्ये देण्यात आला. विजय सिद्धावार हे एक सच्चे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात आपला मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी लोकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात परिवर्तन होण्यास मदत झाली आहे. विजय सिद्धावार यांनी पब्लिक पंचनामा (publicpanchanama.com) नामक साप्ताहिकातून सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, महिला आणि बालकांच्या हक्कांवर लेखन केले.
त्यांनी आपल्या कार्याने समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. त्यांनी कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी मदत केली. त्यांनी आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम केले
सिद्धावार हे प्रयोगशील व्यक्ती असल्याने त्यांनी मुल शहरातील मुलींना डिजिटल व संगणक प्रशिक्षण देण्यासाठी एक मोहीम सुरू केली होती. पब्लिक पंचनामा न्यूज पोर्टल आज जिल्ह्यातील महत्वाचे पोर्टल ठरले आहे. त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात पत्रकाराचे जाळे विणले आहे. मूल शहरासह ग्रामीण भागातील नवतरुणांना पत्रकारितेच्या क्षेत्रात आणण्याचे काम यातून झाले.
Public Media Group
publicpanchanama.com
https://www.publicpanchanama.com
Public panchanama is a Marathi-language Weakly newspaper by public Media Group with its headquarters in Mul, (Dist- chandrapur Maharashtra)
LATEST POSTS
माहिती व तंत्रज्ञानाने कास धरली तेव्हापासून माध्यमात अनेक बदल झालीत. आज सर्वच माध्यमे…">चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले डिजिटल माध्यम | publicpanchanama27/08/2023 - Khabarbat
26/08/2023 - Khabarbat
26/08/2023 - Khabarbat
25/08/2023 - Khabarbat
25/08/2023 - Khabarbat
25/08/2023 - Khabarbat
25/08/2023 - Khabarbat