अनधिकृत गाड्या पार्किंग ला त्वरित आळा घाला.. मनसे चे वाहतूक विभागाला निवेदनाचा माध्यमातून घेराव......
Stop illegal car parking immediately: MNS
मध्य नागपूर हा अतिशय घनदाट वस्ती व रस्त्यांचा भाग असून या क्षेत्रात मोठ्या पूर्वकालीन बाजार पेठा आहेत. त्यामुळे नागपूर शहर व शहराच्या बाहेरील विविध ठिकाणची लोक या भागात खरेदी करण्यासाठी येत असतात., व जागा मिळेल त्या ठिकाणी गाड्या पार्क करीत असतात, महत्वाचे म्हणजे ज्या दुकानात त्यांना खरेदी करावायची असते त्या दुकानदारांकडे गाड्या पार्किंग ची अल्पशी ववस्था असते , कारण त्यांनी दुकान बाणते वेळी ग्राहकांचा गाड्या पार्किंग ची व्यवस्थाच केली नसते, आणी थोडी केली जरी असेल तर तर स्वतःची गाडी व दुकानात काम करणाऱ्या लोकांची गाडी पार्क असते त्या मुळे दुकानात खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक जागा मिळेल तिथे अथवा वाहतुकीला अडथळा जाईल असा ठिकाणी गाडी पार्क करतो त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या जाणाऱ्या अथवा राहणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .
गर्भवती महिला अथवा वृधना तातडीने उपचाराची गरज भासल्यास ट्राफिक जाम अभावी त्यांना तातडीने उपचार मिळत नाही, किंबहुना तातडीने मिळणाऱ्या उपचारा अभावी आपले प्राण सुद्धा गमवावे लागत आहे.
Stop illegal car parking immediately: MNS
काही दुकानदाराणी तर प्रत्यश पणे आपल्या सेकंड हॅन्ड गाडी विक्रीचा व्यवसाय फूटपाथ वरती थाटला आहे त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना फुटपाठच मिळत नाही.. मध्य नागपुरातील चिटणीस पार्क चौक , बढकस चौक , केळीबाग रोड, गांधी पुतळा, शहीद चौक, टांगा स्टँड चौक, तींनल चौक, नंगा पुतळा चौक, गांजाखेत चौक , गोळीबार चौक , मोमीन पुरा, इतवारी मस्कसाथ , बस स्टॅन्ड या क्षेत्रात ट्राफिक जाम च्या समस्या जास्त प्रमाणात आहे तरी वाहतूक विभाग तर्फे सदर क्षेत्रात त्वरित कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्य विभाग, नागपूर शहर तर्फ करण्यात आली , या वेळी मध्य विभाग अध्यक्ष प्रशांत निकम , जनहित चे मा. जिल्हा अध्यक्षइक्बाल जी रिजवी, विभाग उपाध्यक्ष गौस मोमीन, अभय व्यवहारे, अण्णा गजभिये , नितीन बंगाले , शुभम नंदनवार , सचिन निमजे निखिल खापेकर , रिंकू ताई साखरे , गणेश ढोले व अन्य उपस्तिथ होते.