Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३

नागपूर शहरात वीज कर्मचा-यांना मारहाण | Electricity workers beaten up in Nagpur city

वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात

कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही

 




नागपूर, दि. 29 ऑगस्ट 2023:- नागपूर शहरातील बिनाकी उपविभाग अंतर्गत वनदेवी नगर भागात फ्यूज कॉलच्या तक्रारीवर उपस्थित असताना, महावितरणच्या कर्मचा-यांवरआणि टॉवर शिडीच्या वहनावरर दगडफेक आणि विटा फेकण्यात होत्या, त्यात कर्मचारी थोडक्यात बचावला त्याच दिवशी सकाळी त्याच वनदेवी नगर परिसरात महावितरणच्या दोन कर्मचा-यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती. याचसोबत काटोल ग्रामीण उपविभागातील भिष्णूर येथे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ सुभाष घरत यांना देखील घक्काबुक्की झाल्याच्या घटना नुकत्याच झालेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात महावितरणतर्फ़े संबंधितांनाविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. Electricity workers beaten up in Nagpur city



महावितरण कर्मचारी ऊन, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचा-यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते अशांसाठी भा.दं.वि. चे कलम 353 या कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भुमिका घेतली असुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे. वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504 व 506 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत असून, कलम 353 नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद आहे तर कलम 332 नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद असून कलम 504 व 506 नुसार प्राणांकीत हल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.



वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरणच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.



महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफ़ोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे?' असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. 'उद्दीष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीज पुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. वीज कर्मचा-यांना होणा-या मारहाणीच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

  • Cryptocurrency
  • NFT
  • Metaverse
  • Web3
  • Blockchain
  • Investing
  • Personal Finance
  • Business
  • Marketing
  • Entrepreneurship
  • Health and Wellness
  • Travel

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.