Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची गुरुवारपासून बैठक; महत्वाचे ठराव होणार | Alliance meeting for Lok Sabha elections

भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांची मुंबईत संयुक्त बैठक


महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आ. प्रसाद लाड यांची माहिती 



भारतीय जनता पार्टी , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या या आढावा बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.  Alliance meeting for Lok Sabha elections 


        भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदास कदम, खा. गजानन कीर्तिकर, जोगेंद्र कवाडे, आ. विनय कोरे, आ. महादेव जानकर,आ. बच्चू कडू, आ. हितेंद्र ठाकूर आणि सदाभाऊ खोत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री,भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख उपस्थित राहणार आहेत असेही आ. लाड यांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.१ सप्टेंबर रोजी वरळी येथे विभागनिहाय आढावा बैठका होणार आहेत , असेही आ. लाड यांनी नमूद केले.

  Alliance meeting for Lok Sabha elections 
  • Cryptocurrency
  • NFT
  • Metaverse
  • Web3
  • Blockchain
  • Investing
  • Personal Finance
  • Business
  • Marketing
  • Entrepreneurship
  • Health and Wellness
  • Travel

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.