Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची गुरुवारपासून बैठक; महत्वाचे ठराव होणार | Alliance meeting for Lok Sabha elections

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची गुरुवारपासून बैठक; महत्वाचे ठराव होणार | Alliance meeting for Lok Sabha elections

भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांची मुंबईत संयुक्त बैठक


महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आ. प्रसाद लाड यांची माहिती 



भारतीय जनता पार्टी , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या या आढावा बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.  Alliance meeting for Lok Sabha elections 


        भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदास कदम, खा. गजानन कीर्तिकर, जोगेंद्र कवाडे, आ. विनय कोरे, आ. महादेव जानकर,आ. बच्चू कडू, आ. हितेंद्र ठाकूर आणि सदाभाऊ खोत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री,भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख उपस्थित राहणार आहेत असेही आ. लाड यांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.१ सप्टेंबर रोजी वरळी येथे विभागनिहाय आढावा बैठका होणार आहेत , असेही आ. लाड यांनी नमूद केले.

  Alliance meeting for Lok Sabha elections 
  • Cryptocurrency
  • NFT
  • Metaverse
  • Web3
  • Blockchain
  • Investing
  • Personal Finance
  • Business
  • Marketing
  • Entrepreneurship
  • Health and Wellness
  • Travel

शनिवार, ऑगस्ट ०५, २०२३

 भरकोर्टात न्यायधिशानी दिला राजीनामा; कारण वाचून.... | Nagpur Justice Rohit Dev

भरकोर्टात न्यायधिशानी दिला राजीनामा; कारण वाचून.... | Nagpur Justice Rohit Dev

Nagpur Justice Rohit Dev  | नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांनी कोर्टरूममध्येच दिला राजीनामा

rohit deo nagpur highcourt

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव ( Justice Rohit Dev ) यांनी भर कोर्टरूममधे राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुरूवारी त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली कऱण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती. त्यावर व्यथित होऊन रोहित देव यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.


न्यायमूर्ती रोहित देव हे (Justice Rohit Dev) शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच नागपूर खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये आले आणि त्यांनी कोर्टरूममधल्या उपस्थितांसमोर आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेनंतर कोर्टरूममधील सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी कोर्ट रूममधल्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या वागण्यामुळं कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं म्हणून न्यायमूर्ती रोहित देव तिथून निघून गेले. 


एका वकिलाच्या म्हणण्यानुसार, न्यायमूर्ती देव म्हणाले, “न्यायालयात उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. मी तुमाला शिव्या देतो कारण तू सुधारावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबासारखे आहात म्हणून मला तुमच्यापैकी कोणाचेही मन दुखवायचे नाही परंतु मी माझा राजीनामा सादर केला आहे हे कळविण्यास मला खेद होत आहे. मी माझ्या स्वाभिमानाच्या विरोधात काम करू शकत नाही. तुम्ही लोक खूप मेहनत करा."


न्यायमूर्ती देव rohit deo nagpur highcourt यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, मी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे आणि त्यांचे राजीनामा पत्र राष्ट्रपतींना पाठवले आहे. 

गेल्या वर्षी न्यायमूर्ती देव यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांची कथित माओवादी संबंधांच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.  सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

न्यायमूर्ती देव यांनी महाराष्ट्र सरकारच्या ३ जानेवारीच्या शासन निर्णयाच्या (जीआर) अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. या प्रस्तावाद्वारे नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या बांधकाम किंवा अंमलबजावणीच्या कामात गुंतलेल्या कंत्राटदारांकडून गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाची दंडात्मक कारवाई रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले. rohit deo nagpur highcourt

न्यायमूर्ती देव यांची जून 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि डिसेंबर 2025 मध्ये ते निवृत्त होणार होते.


#nagpur #highcourt #justice #rohitdev #courtroom

मंगळवार, मे ०२, २०२३

 दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली; यादी वाचा, तुकाराम मुंडेना नवी जबाबदारी  IAS Transfers In Maharashtra

दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली; यादी वाचा, तुकाराम मुंडेना नवी जबाबदारी IAS Transfers In Maharashtra

 दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली; यादी वाचा, तुकाराम मुंडेना नवी जबाबदारी  IAS Transfers In Maharashtra



राज्य सरकारने आज दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली (IAS Transfers In Maharashtra) केली आहे. आज झालेल्या बदल्या या महत्त्वाच्या बदल्या आहेत. जी श्रीकांत (G Sreekanth) हे  छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे. #छत्रपतीसंभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तपदी जी.श्रीकांत यांची नेमणूक झाली आहे. जी.श्रीकांत हे २००९ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असून या नियुक्तीपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कर विभागाच्या सह आयुक्त पदावर कार्यरत होते.तर, पी शिवशंकर (P Shivshankar) हे शिर्डी संस्थानचे (Shirdi Sansthan CEO) नवे सीईओ असतील. राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

( Maharashtra IAS Transfer:  )

1.  1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.   


2. 1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


3. 1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 


4. 1995 च्या अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


5.  मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


6. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी  श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 


7.  तुकाराम मुंढे, कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


8. 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे. 


9. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


10. पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे. 

 ताडोबा अभयारण्यात मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू  | tourists Mumbai Tadoba Sanctuary

ताडोबा अभयारण्यात मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू | tourists Mumbai Tadoba Sanctuary

ताडोबा अभयारण्यात मुंबईच्या पर्यटकांचा मृत्यू




चंद्रपूर (Chandrapur) । जिल्ह्यातील ताडोबा (TATR) अभयारण्यामध्ये सफारीसाठी आलेल्या पर्यटकाचा tourist  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी उघडकीस आली आहे. 


ताडोबाच्या कोअर झोनमध्ये श्री केशव रामचंद्र बालगी (Keshav Ramchandra Balagi ) हे मुंबईहून पर्यटक आले होते. ते ७१ वर्षांचे होते. त्याना काळाआंबा परिसरात आपल्या कुटुंबासमवेत सफारी दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.



पर्यटक मार्गदर्शक आणि वाहन चालक यांनी तात्काळ वाहन प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बुद्रुक येथे आणले. मात्र तिथे आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत पर्यटकांच्या कुटुंबाला धीर देऊन सांत्वन करण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाचे कोलारा परिसरातील वनपरिक्षेत्र अधिकारी पी एल चव्हाण (PL Chavan, Forest Range Officer of Kolara ) यांनी दिली आहे. 





 

सोमवार, मे ०१, २०२३

 मला अडवून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान | Uddhav Thackeray  MVA vajramuth Sabha Full Speech

मला अडवून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान | Uddhav Thackeray MVA vajramuth Sabha Full Speech

मला अडवून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान 

बारसू मध्ये आपण भेट देणार आहे तिथल्या स्थानिकांच्या काय समस्या जाणून घेणार आहे, हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलं.  त्याचबरोबर मला अडवून दाखवा अशा प्रकारचे आव्हान सुद्धा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. 

मला अडवून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान


वज्र मूठ सभेत ( Uddhav Thackeray  MVA vajramuth Sabha Full Speech) बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे असते तर गद्दारी केली नसती. अदाणींची चौकशी नकोच अदानीविषयी चरित्र ठेवा आत्मचरित्र लावा आणि त्या अभ्यासाला ठेवा, कारण आम्ही अडाणी माणसं आहोत अदानी कसे श्रीमंत झाले हे लोकांना कळू द्या. अदानीच्या चौकशी शिवाय धडा शिकवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


आपल्या देशाचा भूगोल बदलतोय असा वक्तव्य देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केले.  63 वर्ष झाली मराठी माणसाचा लढून मराठी माणसाने लढून रक्त सांडून ही मुंबई मिळवली. मुंबई काही आंदन मिळालेली नाही, असा वक्तव्य या ठिकाणी वैजापूर या सभेतून उद्धव ठाकरे यांनी केले. Uddhav Thackeray


मुंबईमध्ये सुद्धा लोकसंख्या वाढते, आज तर आता देशाची लोकसंख्या देश जगामध्ये नंबर एक झालेली आहे. भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना  सीबीआयच्या सगळ्या केसेस बाहेर काढल्या जातात, यावर उद्धव ठाकरे बोलले.    Uddhav Thackeray