Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०२, २०२३

दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली; यादी वाचा, तुकाराम मुंडेना नवी जबाबदारी IAS Transfers In Maharashtra

 दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली; यादी वाचा, तुकाराम मुंडेना नवी जबाबदारी  IAS Transfers In Maharashtra



राज्य सरकारने आज दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली (IAS Transfers In Maharashtra) केली आहे. आज झालेल्या बदल्या या महत्त्वाच्या बदल्या आहेत. जी श्रीकांत (G Sreekanth) हे  छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे. #छत्रपतीसंभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तपदी जी.श्रीकांत यांची नेमणूक झाली आहे. जी.श्रीकांत हे २००९ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असून या नियुक्तीपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कर विभागाच्या सह आयुक्त पदावर कार्यरत होते.तर, पी शिवशंकर (P Shivshankar) हे शिर्डी संस्थानचे (Shirdi Sansthan CEO) नवे सीईओ असतील. राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

( Maharashtra IAS Transfer:  )

1.  1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.   


2. 1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


3. 1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 


4. 1995 च्या अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


5.  मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


6. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी  श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 


7.  तुकाराम मुंढे, कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


8. 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे. 


9. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


10. पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.