नवेगावबांध व परिसरात आज सायंकाळी ६.४५ वाजता वादळी वारासह मुसळधार पावसाने बेदम झोडपले. रोज सकाळपासून दुपारपर्यंत कडक ऊन व सायंकाळी ५.०० वाजेनंतर पावसाची शक्यता हे रोजचे समीकरण झाले आहे. त्यामुळे सायंकाळ पाणी नक्की येणार याची शक्यता बळावली आहे.दररोज दुपार च्या ३.०० वाजेनंतर आकाशात ढग जमुन काळोख पसरतो.सायंकाळी ५.०० वाजेनंतर वादळ वारा विजांचा कडकडाट यासह मुसळधार पाऊस बरसतो. गेल्या तीन-चार दिवसापासून हे नित्याचे झाले आहे. ( Maharashtra, India Weather Forecast)
दुपारनंतर पावसाळी वातावरण बदलल्यानंतर ६.४५ वाजेच्या दरम्यान सोसाट्याचा वारा वादळ व मुसळधार बेदम पाऊस बरसला आहे. पाऊस पडल्यानंतर वीज बंद होत असल्यामुळे तसेच रात्रभर अधून मधून विजय पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांची फारच गैरसोय होत आहे. तर इकडे हवामान खात्याने ८ ते ९ मे पर्यंत असेच वातावरण राहील.असे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांची धास्ती आणखी वाढली आहे.धान पीक कापणीला आला असताना, गेल्या तीन-चार दिवसापासून सकाळपासून तर दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण व सायंकाळी ५.०० वाजेनंतर येथे व परिसरात जोरदार वादळी पाऊस असे रोजचे झाले आहे. त्यामुळे उन्हाळा की पावसाळा असा संभ्रम होत आहे.भर उन्हाळ्यात पावसाळ्याचे दिवस अनुभवायला मिळत आहेत.याचा परिणाम धान पिकावर नक्कीच होणार व ध्यानाचे उत्पादन घटनार असे चिन्ह दिसत आहेत.या अकाली पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचे घास नक्कीच हिरावले आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वादळी वाऱ्यामुळे नवेगावबांध ते सानगडी मार्गावर मुंगली शिवारापर्यंत वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे काही मोडून तर काही उन्मळून रस्त्यावर पडले आहेत.त्यामुळे चार चाकी वाहन या रस्त्यावर जाऊ शकले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद झाली आहे.मुंगली व काही नवेगावबांध येथील काही उत्साही नागरिक झाडे तोडून जळणासाठी घेऊन जात असल्याचे वृत्त आहे. ( Rain Maharashtra, India Weather Forecast)
पाऊन तासभर बेदम पावसाने झोडपले
त्याचप्रमाणें नवेगावबांध ते अर्जुनी मोरगाव राज्य महामार्गावर वादळाने झाडे काही उन्मळून तर काही मोडून पडल्यामुळे मार्गावर वाहतूकिला अडथळा निर्माण झाला आहे.त्यामुळे वाहनाच्या रांगा च्या रांगा लागल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.