ताडोबा अभयारण्यात मुंबईच्या पर्यटकांचा मृत्यू
चंद्रपूर (Chandrapur) । जिल्ह्यातील ताडोबा (TATR) अभयारण्यामध्ये सफारीसाठी आलेल्या पर्यटकाचा tourist हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी उघडकीस आली आहे.
ताडोबाच्या कोअर झोनमध्ये श्री केशव रामचंद्र बालगी (Keshav Ramchandra Balagi ) हे मुंबईहून पर्यटक आले होते. ते ७१ वर्षांचे होते. त्याना काळाआंबा परिसरात आपल्या कुटुंबासमवेत सफारी दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.
पर्यटक मार्गदर्शक आणि वाहन चालक यांनी तात्काळ वाहन प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बुद्रुक येथे आणले. मात्र तिथे आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत पर्यटकांच्या कुटुंबाला धीर देऊन सांत्वन करण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाचे कोलारा परिसरातील वनपरिक्षेत्र अधिकारी पी एल चव्हाण (PL Chavan, Forest Range Officer of Kolara ) यांनी दिली आहे.