चंद्रपूर :- केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात आमदार सुधाकर अडबाले यांच्या विजयानिमित्त गांधी चौक चंद्रपूर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी मंचावर आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार व्हि.यू.डायगव्हाणे, डॉ.बबनराव तायवाडे, सीमाताई अडबाले, जुनी पेन्शन हक्क संघटन अध्यक्ष वितेश खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदिप गिर्हे, चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, परशुराम धोटे, प्रा.अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्राचार्य शाम धोपटे, विज्युक्टा अध्यक्ष राजेंद्र खाडे, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखंडे राजेश नायडू, संभाजी ब्रिगेड नेते दिलीप चौधरी, केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, चंद्रपूर कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे यांची उपस्थिती होती.
यावेळी ते म्हणाले, जुनी पेंशन योजना हा विषय महत्वाचा आहेच , पण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्ष आहे. त्या प्रमाणे राज्यात देखील शिक्षक आणि सर्व इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्यात यावी. सेवानिवृत्तीचा हा प्रश्न राज्यात महत्वाचा आहे. तो नवनियुक्त आमदारांनी सभागृहात मांडवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रा. बबनराव तायवाडे यांनी आपल्या पदाचा त्याग केला. त्यांचे भविष्यात पुनर्वसन केले जाईल, असा शब्दही खासदार धानोरकर यांनी दिला.
काँग्रेसला पूर्ववत वैभवाचे दिवस आणायचे आहे. सुधारकरराव अडबाले यांना आमदारकीची माळ घालून शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद सदस्य पदासाठी अगदी योग्य उमेदवार आपण निवडून दिला आहे. ते आपल्या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरतील याबद्दल संशय नाही. शिक्षकांवर देशाचे सुजाण व चारित्र्यसंपन्न नागरीक घडविण्याची मुख्य जबाबदारी असतांना निवडणूका, आरोग्य विभाग इत्यांदी मध्ये गुंतविले जाते. शिक्षकांना फक्त विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिकविण्याचेच काम फार मोठे व जबाबदारीचे आहे. यासाठी मी सरकार कडे पाठपूरावा करणार आहे. एकच ध्यास वैयक्तीक विकास या उद्दीष्टाने चालणारी भाजपा प्रणीत सरकारे पदच्यूत करायची तर आपण सर्वांनी देशाच्या व संविधानाच्या रक्षणासाठी एकत्रीतपणेे लढा देण्याची गरज आहे. असे देखील खासदार बाळू धानोरकर यांनी म्हंटले.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर बोलताना म्हणाल्या कि, शिक्षक मतदार संघाच्या माध्यमातून एक चांगला, अभ्यासू, कर्मठ आणि शिक्षकांना न्याय मिळवून देणारा आमदार सुधाकर अडबाले रूपाने यांचे मिळाला. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी झाले, हा ऐतिहासिक विजय असून, जुनी पेन्शन योजना नक्कीच लागू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Increase the retirement age from 58 to 60 years MP Balu Dhanorkar's