Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १८, २०२३

प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील एका महिला भाविकेचा मृत्यू.

कुंभरे कुटूंबियांवर शोककळा. प्रभाबाईच्या दुर्दैवी निधनाने हळहळले नवेगावबांधवाशी.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१८ फेब्रुवारी:-
प्रतापगड यात्रेत महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान श्री शंकराच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या नवेगावबांध येथील एका भाविक महिलेचे दुर्देवी निधन झाले.मृतक महिलेचे नाव प्रभाबाई नीलकंठ कुंभरे (वय ५२वर्षे)असे आहे.यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुखद घटना महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रतापगड यात्रेत घडली.
नवेगावबांध येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नीलकंठ कुंभरे यांच्या पत्नी प्रभाबाई वय ५५ वर्षे यांचे आज प्रतापगड यात्रेत दुःखद निधन झाले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर त्यांचे दुःखद निधनाने कुंभरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.त्या ग्रामपंचायत सदस्य विजय कुंभरे यांच्या मातोश्री आहेत.ही दुर्दैवी घटना दुपारी ३.०० वाजेच्या दरम्यान घडली. प्रभाबाई यांच्या दुर्देवी निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.यात्रेदरम्यान एखाद्या भाविकांचा मृत्यू व्हावा .ही प्रतापगड यात्रेतील पहिलीच घटना आहे,असे सांगितले जाते. मृतक प्रभा ह्या  प्रतापगड यात्रेत सहभागी झाल्या.त्या वर गडावर चढत होत्या. वाटेत त्यांच्या लहान मुलाच्या दुकानात विश्रांती घेतली. पुढे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी जायला निघाल्या त्या उभ्या राहिल्या बरोबर समोर अचानक भोवळ येऊन खाली जमिनीवर कोसळल्या. पडल्या त्यांचा त्याच क्षणी मृत्यूझाला असा अंदाज आहे.प्रतापगड यात्रेत त्या कोसळल्या त्या वेळेस त्याचे जवळ त्याचा लहान मुलगा वैभव सोबत होता.
त्या भोले शंकराचे दर्शन घेण्यासाठी प्राचीन मंदिरात वर टेकडीवर जात असताना, सीतेच्या न्हानीजवळ पोहोचल्या असता,अचानक भोवळ येऊन  खाली पडल्या. त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी तसेच यात्रेकरूंनी त्यांना नजीकच असलेल्या आरोग्य विभागाच्या आरोग्य शिबिरात उपचारासाठी नेले. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतक प्रभा यांना मृत घोषित केले. त्यांचे प्रेत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.त्यांच्यावर उद्या दि.१९ फेब्रुवारी रोज रविवारला सकाळी १०.०० वाजता स्थानिक स्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.