Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गोंदिया. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोंदिया. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ऑक्टोबर ०१, २०२३

हरीषभाऊ बन्सोड यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट. आर्थिक मदत करून दिली मानवतेचा संदेश.

हरीषभाऊ बन्सोड यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट. आर्थिक मदत करून दिली मानवतेचा संदेश.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१ ऑक्टोबर:-
सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी येथील शेतकरी रमेश कोल्हे वय वर्ष ५७ या शेतकऱ्याने गाव शिवारात झाडाला गळफास लागून आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर घरचा कर्ता पुरूष गेल्याने उपासमारीची पाळी आली या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हरीषभाऊ बन्सोड यांनी आर्थिक मदत करून मानवतेचा संदेश दिला आहे यांच्या सोबत यावेळी कनेरी येथील सरपंच ज्योती प्रकाश पाउलझगडे, उपसरपंच विशाल वाघाये,भरत मेंढे, विणू भेंडारकर, दिनेश मोहतुरे,सुधीर शिवणकर आदी गावकरी उपस्थित होते या वेळी हरीषभाऊ बंसोड यांनी शासनाच्या मदत मिळवून देण्यास मदत करू असे आश्वासन दिले....

शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

रेती तस्करांमुळे सौंदड येथील बायपास मार्गाची दुर्दशा.

रेती तस्करांमुळे सौंदड येथील बायपास मार्गाची दुर्दशा.



संजीव बडोले.
नवेगावबांध दि.२सप्टेंबर:-
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील बायपास रस्ता महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. सौंदड पिपरी ५ किमी. रस्ता सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत तयार करण्यात आला. आजघडीला या मार्गाने अवैध मुरुमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. अवैध मुरुम,रेतीचे ओव्हरलोड ट्रक,ट्रॅक्टर रात्रंदिवस रेतीची वाहतूक करीत असतात.. तस्करांनी अक्षरश: या मार्गाची वाट लावली आहे.सद्यस्थितीत या रस्त्यावर १-१,२-२ मीटरचे खड्डे पडले आहेत.त्याकारणाने अनेकदा दुर्घटना होत असतात.मात्र याकडे संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांनी ढुकूंनही पाहिले नाही.वास्तविक रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे ५ वर्षापर्यंत कंत्राटदाराकडे असते.तेसुद्धा केले गेले नाही.या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रेती तस्करांनी रस्त्यावर मुरुम टाकून भर पावसाळ्यात माती भरलेल्या खड्ड्यामध्ये पुन्हा चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.याकारणाने गांधी वार्डातील नागरिकांचे घरासमोर चिखल व पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्यावर परिणाम पडत असून डेंगू,मलेरिया पसरविणा-या रोगांना कारणीभूत ठरत असल्याची नागरिक बोलत आहेत.
चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.

चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.

                         


संजीव बडोले.
नवेगावबांध दि.२सप्टेंबर:-
सडक अर्जुनीतालुक्याच्या टोकावर व व्याघ्र प्रकल्पाचे सिमेवरील लेंडेझरी ते चिचटोला या ५.५ किमी. जिल्हा मार्ग दुरुस्तीचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर काम म.रा. ग्रामविकास मंत्रालयाचे सौजन्याने होत आहे.या कामासाठी ३२९ लक्ष रुपये  निधीचे कामाचे कंत्राट गोंदिया येथील कंत्राटदार सरफराज अमीन गोडील यांना असून सदर काम ८  नोव्हेंबर २०२१ ते ७नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे होते.पण आज सन २०२३ संपण्याचे मार्गावर असून काम पूर्णत्वास आले नाही.मुख्य कंत्राटदाराने सदर काम पेटी कंत्राटवर बाम्पेवाडा येथील कंत्राटदाराला दिले आहे.पेटी कंत्राटदाराने प्रथम खडीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेच डांबरीकरण करणे अपेक्षित होते.मात्र लेंडेझरी ते धानोरी ३ किमी.पर्यंत खडीकरण करून ठेवले आहे.लेंडेझरी ते धानोरी दरम्यान डांबरीकरणाचे काम आजही रखडले आहे.पेटी कंत्राटदाराने ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम केल्याने डांबरीकरण उखळत आहे.सदर डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून काम व्यवस्थित होत नसल्याने काम नागरिकांनी थांबविले आहे.वास्तविक डांबरीकरणाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे होते.तसेच धानोरी ते चिचटोला २.५ किमी.खडीकरणाचे काम आजही रखडले आहे.रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे ठेवल्याने शेतक-यांना व नागरिकांना ये-जा करतांनी त्रास  सहन करावा लागत आहे.सदर रस्ता शेतामधून पूर्वीचाच असल्याने या रस्त्याचे चौवळीकरण न करता कंत्राटदार माती मुरुम जास्त लागत असल्याने पूर्वीच्याच असलेल्या रस्त्यावर रस्ता बनवित आहे.रस्त्याचे काम पूर्ण करण्याची कालावधी संपून एक वर्ष झाला तरी रस्त्याचे बांधकाम अपूरे आहे.                   ‌                                           ‌ ================    ‌ **कंत्राटदाराला नोटीस देऊन कारवाई करा**::--रस्त्याचे काम करण्याची कालावधी लोटून एक वर्ष झाले आहे.या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम एक वर्षापासून रखडले आहे.याकडे संबंधित बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही.संबंधित कंत्राटदाराला बांधकाम विभागाने नोटीस बजावून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे.तसेच कामात दिरंगाई केल्याने कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी.                      ‌                                           ‌   **अनिता बांबोळे माजी सरपंच चिचटोला**                ‌                                             ‌ =================  ‌                                       ‌‌ ‌ ================= ‌                                       ‌ ‌ **चिचटोला-धानोरी हा मार्ग शेतशिवारात जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग आहे.या मार्गाची स्थिती दयनीय झाली असून दोन्ही कडेला मुरुमाचे ढिगारे ठेवले असल्याने ये-जा करणारे शेतक-यांना व नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.या मार्गाने मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागते.या मार्गाचे काम कंत्राटदाराने त्वरीत पूर्ण करावे.अन्यथा कंत्राटदाराविरोधात तक्रार करावी लागेल**                  ‌                                          ‌    **सदाशिव कापगते माजी उपसरपंच चिचटोला**                       ‌                                       ‌‌ ‌ ================

शुक्रवार, जून ३०, २०२३

आजपासून शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व नवागतांचे जंगी स्वागत.

आजपासून शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व नवागतांचे जंगी स्वागत.






शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिष्ठांन्नाची मेजवानी.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३० जून.
गुलाब पुष्प व पुष्पगुच्छ देऊन नवागत विद्यार्थ्यांचे शाळांमधून मुख्याध्यापक व शिक्षकांकडून आनंददायी स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण शाळेच्या आजच्या दिवशी पाहायला मिळाले.
आज ३० जूनला शाळेच्या नवीन शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात झाली असून,मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी शाळांमधून उपस्थिती दर्शवली आहे. शाळेमध्ये झालेल्या जंगी स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.
शाळा प्रवेशोत्सव व कुणीही विद्यार्थी गैरहजर राहू नये,यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती घडविण्यासाठी अनेक शाळांमधून गावातून शोभायात्रा काढण्यात आल्यात.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या,शाळा सजवण्यात आल्या.आनंददायी स्वागतानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, त्या-त्या इत्तेनुसार पुस्तके वाटप करण्यात आले.तसेच शालेय पोषण आहारात मिष्ठांन्न वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहातसाजरा करण्यात आला. मुख्याध्यापक शिक्षकांबरोबरच,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसांडून वाहत होता.शिक्षण विभागाचे तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी शाळांना भेटी दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव त्यांचे जंगी स्वागत करून करण्यात आल्यामुळे, पालकांमध्येही उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे नवागत विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थित विद्यार्थ्यांचेही गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे व शिक्षकांनी जंगी स्वागत केले. विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख एस.व्ही. बडोले,जे.एस.हटवार,के.एम.भैसारे, एम यु घरोटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एच एस पात्रीकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम.एम.साखरे, बी.आर.पंचलवार यांनी सहकार्य केले.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावरटोला येथे प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच
युवराज तरोणे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डुडेश्वर तरोणे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पद्माताई सुखदेवे, म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सरीताताई मेश्राम, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, म. गांधी तंटामुक्त समिती सदस्य आणि गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. मुख्याध्यापकआर.के.कापगते यांनी प्रास्ताविक मांडून अतिथींचे स्वागत केले. शिक्षक एच.बी.बहेकार,ए.के.वासनिक,डी.एम. कोरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालक मंडळीी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोट-
आज शाळेच्या पहिल्याच दिवशी आमच्या मुलांचे शाळेत पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले.त्यांना गणवेश व नवीन कोऱ्या पुस्तका मिळाल्या याचा आनंद आहे.आजचा पहिलाच दिवस आनंददायी ठरल्यामुळे,विद्यार्थ्यांमध्ये रोजच नियमित शाळेत जाण्याचा उत्साह कायम राहील.
-कुंजीलाल कुंभारे,
पालक,सावरटोला.

आज शाळेचा पहिला दिवस विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात विद्यार्थ्यांचे आम्ही जंगी स्वागत केले. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तका दिल्यात. तसेच शालेय पोषण आहारात
मिष्ठांन्नही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
-एस.एस.टेंभुर्णे, मुख्याध्यापक
सम्राट अशोक विद्यालय,उमरी.

शाळेतील सर्व मुले व पालकांना शाळा सुरू झाली आहे याची माहिती व्हावी, शाळेच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के उपस्थिती राहावी, पहिलीच्या मुलांना शाळेत येताना ताण येऊ नये,यासाठी पालकांना खेळीमेळीच्या वातावरणात शाळेत आणण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये शाळेत येण्याविषयी घोषणा, नारे, देशभक्ती गीत गायन करण्यात आले.
- राजकुमार कापगते
मुख्याध्यापक,जिल्हा परिषद शाळा सावरटोला.

शुक्रवार, जून ०२, २०२३

कत्तलखान्यात जाणाऱ्या ट्रकची धान वाहून नेणाऱ्या ट्रकला जबर धडक. ट्रक मधे खचाखच भरली होती गाय,बैल.

कत्तलखान्यात जाणाऱ्या ट्रकची धान वाहून नेणाऱ्या ट्रकला जबर धडक. ट्रक मधे खचाखच भरली होती गाय,बैल.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२ जून:-
आज (शुक्रवार दि.२)पहाटे पाच वाजता   नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात सदर घटना घडलीआज (शुक्रवार दि.२)पहाटे पाच वाजता   नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात सदर घटना घडली छत्तीसगड मधून चिचगड नवेगावबांध सानगडी मार्गे नागपूर ला जनावरे भरून भरधाव वेगात (ट्रक क्रमांक  MP 04 GB 4456 ) नेण्यात येत होती .त्याच वेळेस अर्जुनी-मोर - नवेगावबांध -कोहमारा या हायवेवर अर्जुनी-मोर कडून कोहमारा मार्गे आमगाव ला धान घेवून जाणारे ट्रक क्रमांक MH 33T 2522  या ट्रक ला छत्तीसगड कडून जनावरांचा भरधाव ट्रक ने धडक दिली.
आज (शुक्रवार दि.२)पहाटे पाच वाजता   नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात सदर घटना घडली.
धडक एवढी जोरदार होती की, यामधे धान भरलेला ट्रक ने पलटी खाल्ली यात सुदैवाने कोणालाही गंभीर जखम किंवा जिवीत हानी झाली नाही.जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.घटनास्थळावरून या ट्रक चालक अशफ़ाक शेख व कनड्रायव्हर इरफान रैफ या दोघाना ताब्यात घेवून त्यांवर गुन्हा नोंदवून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करण्यात आले आहे .या घटनेचा गुन्हा नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२३ अन्वये प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत  भा.द.वी.२७९ ,४२७ अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पहाटेची वेळ असल्याने या चौकात सकाळी सकाळीच फिरायला जाणारांची गर्दी होती.
माहीती मिळताच घटनास्थळावर लगेचच नवेगावबांध चे ठाणेदार संजय पांढरे आपल्या शिपायासह पोहोचून परिस्थिती चा आढावा घेवून जनावरे भरलेला ट्रक पोलीस स्टेशनला लावून गुन्हा दाखल केला आहे. ट्रक मधिल सर्व जणावरे  मीनी ट्रक च्या सहाय्याने शासन मान्य ज्ञान फांऊडेशन साकोली च्या गो शाळेत पाठविण्यात आली आहेत .
घटनेची माहीती मिळताच शिवसेना ठाकरे गट चे गोंदिया जिल्हाध्यक्ष शैलेश जयस्वाल, नवेगावबांध चे शाखाप्रमुख मुकेश चाफेकर, घनश्याम कापगते यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन ला पोहोचून घटनेची माहीती घेवून कतली साठी जाणारी जणांवर सुपरूत नाम्यावर रजिस्टर संस्थे कडे सोपविण्यात यावे,ही मागणी केली परंतु ठाणेदार संजय पांढरे यांनी गुन्हा नोंद करून नियमानुसार सदर जनावरे गोशाळेत पाठविली.
 या पुर्वी जणांवर अवैध वाहतूक करनाऱ्यांवर नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्तीसगड कडून देवरी-चिचगड-धाबेपवनी नवेगावबांध हा मार्ग नक्षलप्रभावीत क्षेत्र असल्याने या मार्गावर सदर जणांवर तस्करी करणारे ट्रक हे रात्री बेरात्री सुसाट वाहतूक करतात .अशा सुसाट वाहतुकीवर नवेगावबांध पोलीस ठाण्याचे स.पो.नी.संजय पांढरे याचे कडून कडक कारवाई ची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.
नवेगावबांध येथिल टी पाॅईन्ट चौकात मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावर दूकाणे थाटली असून,आठवडी बाजार पण भरविण्यात येत आहे. जड वाहतूक या मार्गावर होत असते.सुसाट वेगात जाणारी वाहने अशावेळेस वेळी अशाचप्रकारे मोठी दुर्घटना झाली तर मोठ्याप्रमाणात जिवीत व वीत्त हानी होण्यास वेळ लागणार नाही. या  मुळे नाहक लोकांचे बळी जातील,या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून बघ्याचीच भुमीका पार पाडत आहे.