Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.

                         


संजीव बडोले.
नवेगावबांध दि.२सप्टेंबर:-
सडक अर्जुनीतालुक्याच्या टोकावर व व्याघ्र प्रकल्पाचे सिमेवरील लेंडेझरी ते चिचटोला या ५.५ किमी. जिल्हा मार्ग दुरुस्तीचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर काम म.रा. ग्रामविकास मंत्रालयाचे सौजन्याने होत आहे.या कामासाठी ३२९ लक्ष रुपये  निधीचे कामाचे कंत्राट गोंदिया येथील कंत्राटदार सरफराज अमीन गोडील यांना असून सदर काम ८  नोव्हेंबर २०२१ ते ७नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे होते.पण आज सन २०२३ संपण्याचे मार्गावर असून काम पूर्णत्वास आले नाही.मुख्य कंत्राटदाराने सदर काम पेटी कंत्राटवर बाम्पेवाडा येथील कंत्राटदाराला दिले आहे.पेटी कंत्राटदाराने प्रथम खडीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेच डांबरीकरण करणे अपेक्षित होते.मात्र लेंडेझरी ते धानोरी ३ किमी.पर्यंत खडीकरण करून ठेवले आहे.लेंडेझरी ते धानोरी दरम्यान डांबरीकरणाचे काम आजही रखडले आहे.पेटी कंत्राटदाराने ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम केल्याने डांबरीकरण उखळत आहे.सदर डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून काम व्यवस्थित होत नसल्याने काम नागरिकांनी थांबविले आहे.वास्तविक डांबरीकरणाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे होते.तसेच धानोरी ते चिचटोला २.५ किमी.खडीकरणाचे काम आजही रखडले आहे.रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे ठेवल्याने शेतक-यांना व नागरिकांना ये-जा करतांनी त्रास  सहन करावा लागत आहे.सदर रस्ता शेतामधून पूर्वीचाच असल्याने या रस्त्याचे चौवळीकरण न करता कंत्राटदार माती मुरुम जास्त लागत असल्याने पूर्वीच्याच असलेल्या रस्त्यावर रस्ता बनवित आहे.रस्त्याचे काम पूर्ण करण्याची कालावधी संपून एक वर्ष झाला तरी रस्त्याचे बांधकाम अपूरे आहे.                   ‌                                           ‌ ================    ‌ **कंत्राटदाराला नोटीस देऊन कारवाई करा**::--रस्त्याचे काम करण्याची कालावधी लोटून एक वर्ष झाले आहे.या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम एक वर्षापासून रखडले आहे.याकडे संबंधित बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही.संबंधित कंत्राटदाराला बांधकाम विभागाने नोटीस बजावून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे.तसेच कामात दिरंगाई केल्याने कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी.                      ‌                                           ‌   **अनिता बांबोळे माजी सरपंच चिचटोला**                ‌                                             ‌ =================  ‌                                       ‌‌ ‌ ================= ‌                                       ‌ ‌ **चिचटोला-धानोरी हा मार्ग शेतशिवारात जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग आहे.या मार्गाची स्थिती दयनीय झाली असून दोन्ही कडेला मुरुमाचे ढिगारे ठेवले असल्याने ये-जा करणारे शेतक-यांना व नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.या मार्गाने मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागते.या मार्गाचे काम कंत्राटदाराने त्वरीत पूर्ण करावे.अन्यथा कंत्राटदाराविरोधात तक्रार करावी लागेल**                  ‌                                          ‌    **सदाशिव कापगते माजी उपसरपंच चिचटोला**                       ‌                                       ‌‌ ‌ ================

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.